एकेरी वाहतूक सुरळीत करा व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
जागृत पत्रकार संघाचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
गिरीश कुबडे, वणी: वणी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वाहतूक नियमांचे उलंघन होत असल्याचे चित्र संपूर्ण वणी शहरात निर्माण झाले आहे. तसेच शहरात विविध चौकात मोकाट जनावराचा सुळसुळाट निर्माण झाला आहे. त्यामुळे अपघाताची तसेच ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत वणीतील जागृत पत्रकार संघातर्फे एसडीओंना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की शहरात विना लायसंस दोन चाकी-चार चाकी वाहन चालविणे अडथळा व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वणी शहरात टिळक चौक ते आंबेडकर चौक अशी एकेरी वाहतुक गेल्या दोन महिण्यापासुन बंद होती. आता ही एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. परंतु टिळक चौक ते एस.पी.एम हायस्कुल या रस्त्यावर दुरुस्तीचे काम सूरु असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना ये जा करताना मनस्ताप सहन करावा लागत आहे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे.
हा रस्ता दुरुस्त होईपर्यत एकेरी वाहतूक बंद ठेवण्यात यावी. वणी शहरातील पोलीस वाहतुक शाखेचे कर्मचारी हे शहरात चौकात रस्त्यावर उभे राहून वाहनांना दिशा देण्याचे काम नाही तर रस्त्याच्या आडोश्याला उभे राहता वाहतुकीचा नियम तोडला कि चार चाकी व दुचाकी वाहनधारकाना पकडून त्यांच्या कडून वसुली करतात. हा प्रकार वाहतुक पोलीस आपल्या विभागाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी करतात. असा आरोप ही निवदेनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या पॉईंट वर उभे राहून वाहतूक सुरळीत करावी आणि दिशा द्यावी, तसेच शहरात मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे जागो जागी उभे राहत असल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथडा निर्माण होऊन अपघाताची दाट शकता निर्माण झाली आहे. तरी तात्काळ नगर परिषदेने लक्ष घालून जनावराचा बंदोबस्त करावा अशी मागणी दीपक छाजेड , पुरुषोत्तम नवघरे, संदीप बेसरकर, राजेश धावंजेवार, परशुराम पोटे, सागर मुने, मुस्ताक शेख, विवेक तोटेवार यांनी निवेदनातून केली आहे.