गिरीश कुबडे, वणी: वणीतील जैन ले आऊट परिसरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून नळाला दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रश्नाकडे नगर परिषद व प्रशासन लक्ष न देत नसल्याने येथील रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जातोय.
या दुषित पाण्यामुळे नागरिकांना डायरिया, कॉलरा, पोटदुखी, गॅस्ट्रो यासारखे जीवघेणे आजार होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ हा प्रश्न सोडवावा अशी मागणी जैन ले आऊटमधले रहिवाशी करीत आहे.
लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ….