पुराच्या पाण्यात युवक गेला वाहून, शोध सुरू

पेटूरच्या पुलावरील घटना

0

विलास ताजने, (मेंढोली): वणी तालुक्यातील मेंढोली येथील एक युवक पेटूरचा नाल्या मधून वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली.

मेंढोली येथील सुनील सुभाष भोयर (27) वर्ष हा युवक वणीतील कामे आटोपून दुचाकीने गावाला परत जात होता. आज दुपारच्या दरम्यान वणी उपविभागात पडलेल्या पावसाने नदी, नाले तुडुंब भरून वाहत होते. पुल ओलांडताना पुलावरील पाण्याचा अंदाज घेण्यासाठी सुनील पुलावर गेला. दरम्यान जोरदार प्रवाहात सुनील पाण्यात पडून वाहून गेला.

पुरात वाहून गेलेला तरुण सुनिल सुभाष भोयर, मेंढोली

सदर घटना माहीत होताच सुनीलचा पाण्यात शोध घेण्यास सुरुवात झाली. परंतु त्याचा शोध लागला नाही. घटनास्थळी असलेल्या दुचाकीवरून तो पाण्यात वाहून गेल्याची चर्चा आहे. मेंढोली, पेटूर येथील अनेक तरुण शोधाशोध करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.