प्रतिबंधित क्षेत्र खुला झाल्याने साईनगरीत डान्स करून जल्लोष

तीन दिवसात एकही रुग्ण नाही, वणीकरांना दिलासा

0

जब्बार चीनी, वणी: घोन्सा येथील एक महिला पॉजिटिव्ह आढळल्यानंतर सध्या तीन दिवसांपासून वणीत एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही सुमारे 300 रिपोर्ट येणे बाकी असल्याने कोरोनाचा धोका टळलेला नाही. दरम्यान 28 दिवस पूर्ण झाल्याने प्रतिबंधित क्षेत्र असलेला परिसर साईनगरी मोकळा करण्यात आला. त्यानिमित्त तेथील नागरिकांनी डिजेच्या तालावर थिरकर आपला आऩंद व्यक्त केला.

सध्या शहरानंतर कोरोनाने ग्रामीण भागात पाय पसरवण्यास सुरूवात केली आहे. वणी तालुक्यात राजूर व घोन्सानंतर मारेगाव तालुक्यात कुंभा व झरी तालु्क्यात मुकुटबन येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र तीन दिवसात वणी तालुक्यात एकही रुग्ण न आढळल्याने वणीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या वणीत एकूण 39 जण पॉजिटिव्ह आढळले असून त्यातील 25 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या 13 व्यक्ती ऍक्टिव्ह आहेत. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये 52 व्यक्ती कॉरन्टाईन असून यवतमाळ येथे 3 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी 119 स्वॅब तपासणीसाठी पाठवले असून अद्याप 296 स्वॅबचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

साईनगरी येथील नागरिकांचा जल्लोष
साईनगरी येथे दिनांक 8 जुलै रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर या परिसर सिल करण्यात आला होता. दरम्यान प्रतिबंधित क्षेत्राचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्याने मंगळवारी हा परिसर खुला करण्यात आला. त्यावेळी इथल्या नागरिकांनी संगिताच्या तालावर डान्स करत आपला आनंद व्यक्त केला. या परिसरात कोरोनाचे 2 रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

लिंकवर क्लिक करून पाहा साईनगरीतील जल्लोषाचा व्हिडीयो…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.