उद्या सुशगंगा पॉलिटेक्निकमध्ये मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह

टाटा, महिंद्रा इ. नामांकित कंपनी करणार विद्यार्थ्यांचे जॉब प्लेसमेन्ट

जब्बार चीनी, वणी: शहरातील सुपरिचित व परिसरातील एकमेव पॉलिटेक्निक कॉलेज असलेल्या सुशगंगा कॉलेजमध्ये सोमवारी दिनांक 23 मे रोजी मेगा कॅम्पस प्लेसमेन्ट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. यात अंतिम वर्षात शिकत असलेले व पास झालेले विद्यार्थी ज्यांचे पॉलिटेक्निक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल या विषयात झालेले आहेत त्यांना सहभागी होता येणार आहे. या मेगा प्लेसमेन्टमध्ये उत्तम पद व पगार सहित मोफत बस, कॅन्टीन आणि विम्याची व्यवस्था देखील कंपनीतर्फे केली जाईल. या मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड, महिंद्रा ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड, अनुवी केमिकल ठाणे प्रायव्हेट लिमिटेड, IQVIA RSD प्रायव्हेट लिमिटेड गैसस्टैंप ऑटोमोविव प्राईवेट लिमिटेड या 6 नामांकित कंपन्यांना आमंत्रित केले आहे. दरवर्षी सुशगंगा पॉलिटेक्निक कॉलेजतर्फे विद्यार्थ्यांसाठी जॉब प्लेसमेन्ट ड्राईव्हचे आयोजन केले जाते. परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी यातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे.

Comments are closed.