युवा शेतक-याने आंब्याच्या झाडाला घेतला गळफास

0
43

भास्कर राऊत, मारेगाव: वेगाव येथील एका युवकाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घङली. राजेंद्र वामन गौरकार, वय अंदाजे 30 वर्षे असे मृतकाचे नाव आहे. तो शेती करायचा. शुक्रवारी तो नेहमी प्रमाणे रात्री शेतामध्ये जागलीसाठी गेला होता. आज शनिवारी 21 मे रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरी देखील आला. मात्र त्याच्या मनात काही वेगळेच होते. तो एका तासाने म्हणजे सुमारे 8 वाजताच्या सुमारास पुन्हा शेतात गेला व तिथे जाऊन त्याने त्याचे काका गौरकार यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

काही वेळाने त्याच्या काकाच्या शेतातील सालगडी शेतामध्ये गेला असता त्याला राजेंद्रने आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्याने आरडाओरड करत परिसरातील शेतक-यांना घटनास्थळी बोलवून घेतले व घरच्यांना याची माहिती दिली. घरचे तिथे आले. त्यांनी याची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली. मारेगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

राजेंद्र हा 30 वर्षाचा तरुण होता आणि लग्नासाठी मुली पाहणेसुद्धा त्याचे सुरु होते. शेतीच्या विवंचनेत तसेच कर्जाच्या बोझ्यामध्ये असल्यामुळे तो विमनस्क स्थितीमध्ये असल्याचे गावात बोलले जात आहे. त्यामुळे कर्जामुळे आत्महत्या केली की आणखी काही वेगळे कारण आहे याचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

वणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह

ब्राह्मणी फाट्याजवळ तंबाखू तस्कराला अटक

ड्रेस डिझायनिंग, एम्ब्रायडरी, मेंदी इ. क्लाससाठी प्रवेश सुरू

हॉरर कॉमेडी भुलभुलय्या 2 आज सुजाता थिएटरमध्ये रिलिज

लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूल व ज्यु. कॉलेजसाठी प्रवेश सुरू

Relief Physiotherapy clinic
Previous articleवणीतील पट्टाचारा नगर व ढाकोरी बोरी जवळ आढळला मृतदेह
Next articleउद्या सुशगंगा पॉलिटेक्निकमध्ये मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...