कायरच्या चण्डिका माता हेमाडपंथी मंदिरात नवरात्रौत्सव आरंभ
सुरेन्द्र इखारे, वणी: येथून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या कायर गावात प्राचीन हेमाडपंथी महिषासुर मर्दिनी माँ चण्डिका मंदिर आहे. श्रद्धा आणि निसर्गाचा इथे सुरेख मिलाफ आहे. त्यामुळे नवरात्रानिमित्त देवीच्या दर्शनाला भाविकांची झुंबड उडते. फार वर्षांपूर्वी पासून चण्डिका मातेचे मंदिर गावालगत असलेल्या तलावाच्या काठावर होते. महिषासुर मर्दिनी मातेच्या मंदिरातून बघितल्यास त्याकाळी सभोवताल पाणीच पाणी दिसत होते. त्यामुळे हा परिसर भाविक भक्तांना मंगलमय वतावरणासोबत आल्हाददायक वाटत होता. हा निसर्गरम्य देखावा भाविक भक्तांना मातेच्या मंदिराकडे आकृष्ट करीत होता. या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती पंचक्रोशीतील अलौकिक शिल्पकलेचा नमुना आहे. मंदिरासमोर पूर्णावस्थेत अखंड पाषाणात पाच क्विंटलची गणपतीची अजस्र मूर्ती आहे. आजही मंदिरात नंदादीप जळत असतो. त्यामुळे कायर परिसरातील भाविक बैलबंडीने मातेच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळते.
या मंदिराच्या बाजूला एक दर्गा असून या दर्ग्यावर मुस्लिम बांधव प्रार्थनेसाठी जातात. त्यामुळेहिंदुचा असो की मुस्लिांचा उत्सव असो दोन्ही समाज एकतेने उत्सव साजरे करतात. आजही हा नित्यक्रम सुरूच आहे. पूर्वीच्या काळी ब्रिटिशांनी तलावाची जागा ही इंग्रज सैनिकांना देण्यात आली. कालांतराने ब्रिटिशांची राजवट संपुष्टात अाली. भारत स्वातंत्र झाला त्यानंतर येथील काही शेतकरी तेथे शेती करू लागले. आता नवरात्रौत्सवात गावातील सर्व नागरिक तनमन धनाने एकत्रित येतात. मंदिराच्या परिसराची स्वछता रंगरंगोटी आकर्षण रोषणाई केली जाते. नवरात्राचे नऊ दिवस कार्यक्रम घेतले जातात.
मंदिराचे प्रमुख भक्त गोपालसिंग भदोरीया, अनिल गोवारदिपे, महेश देशमुख, मोहन सुस्तरवार, मनोज अडेलवर, सरपंच नितीन दखने, विजय बोरुळे, पांडुरंग मोहितकर, बादल पेटकर, चंदू पोलशेट्टीवर, रमेश राजुळवार, भारत आदे, अशोक गुरूनुले, चंदू नागोसे, साबीर पठाण, अफसर बेग, अरविंद गारघाटे, रामन्ना कुंटलवर, शिव महाकुलकर, मंथनवार, रामजी गोंडळावर, कोकुडे, महादेव शकावार, अशोक भाडोरीया, नौशाद शेख, तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण पेटकर व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला