अन् एसडीओंनी स्वत: पकडला खर्रा विक्रेता….

सकाळी टिळक चौकातील घटना...

0

जब्बार चीनी, वणी: सध्या वणीत लॉकडाऊनमुळे अऩेक व्यवसायांना बंदी आहे. पानटपरी सुरू करण्यावरही प्रशासनाने बंदी आणली आहे. मात्र या बंदीमध्ये खर्रा विक्रेता स्वत: उपविभागीय अधिकारी यांनी पकडला. खर्रा विक्रेत्याकडून 14 खर्रे जप्त करण्यात आले असले तरी विक्रेता मात्र गर्दीचा फायदा घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

आज सकाळी टिळक चौक येथे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे हे भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एक 14-15 वर्षांचा मुलगा एका सायकलवरून एका दुचाकीस्वाराला खर्रा विकताना त्यांना आढळला. त्यांनी लगेच तिथे जाऊन त्या खर्रा विक्रेत्याला पकडले. मात्र गर्दीचा फायदा घेऊन त्याने तिथून पळ काढला. त्याच्या कडून 14 खर्रे जप्त करण्यात आले.

उपविभागीय अधिका-यांनी पुढील कारवाईकरिता ठाणेदार वैभव जाधव यांना निर्देश दिले आहेत. यापुढेही अशाच गोपनीय कारवाई करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. सध्या वणीत कोरोनाचा शिरकाव झाला असून खर्रा गुटखा यांची अवैधरित्या विक्री करू नये तसेच लोकांनी खाऊही नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

उत्पादन शुल्क विभाग करणार का कारवाई?
उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी गोपनीय कारवाई करून कर्तव्यदक्षतेचे एक उदाहरण शहरवासियांसमोर ठेवले आहे. मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून वाईन शॉपवर ग्राहकांची एमआरपीपेक्षा 100 ते 200 रुपये अधिक दराने विक्री करून राजरोसपणे लूट होत आहे. छोट्या मोठ्या गरीब व्यवसायिकांवर कारवाई करणे सोपे असते. मात्र उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी आता अशीच गोपनीय कारवाई करून वणीकरांची लाखोंची होणारी लूट थांबवणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे पण वाचा: वणीत भाव  कडाडले… वाईन शॉपवर बम्परमागे 100 ते 200 रुपयांची लूट

वणीत भाव कडाडले… भाज्यांचे भाव गगणाला !

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.