कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची राज्यव्यापी परिषद यशस्वी
शेतकरी प्रश्नांवर ठराव, आंदोलनात्मक वाटचालीचा निर्णय
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणीतील शेतकरी मंदिरात राज्यव्यापी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिषद यशस्वीपणे पार पडली. या परिषदेचे उद्घाटन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर आणि अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. करमसिंग राजपूत होते. यावेळी भाकप राष्ट्रीय कौन्सिलर तुकाराम भस्मे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपूलवार, राज्याध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी, आणि राज्य सरचिटणीस अशोक सोनारकर उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. प्रदीप नागापूरकर, ओंकार पवार, सतीश चौधरी, संजय बाजड, रामप्रभू कोरडे, सी. एन. देशमुख, प्रकाश रेड्डी, आणि द्वारका इमडवार सहभागी झाले. परिषदेत कापूस आणि सोयाबीन उत्पादनातील आव्हाने, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांचे कारणे आणि त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शकांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या चर्चेतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हाताळण्यासाठी ठोस उपाय सुचवण्यावर भर देण्यात आला.
या परिषदेने विविध ठराव पारित करून पुढील कृती कार्यक्रम आखला असून, किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना संघटीत करून आंदोलनात्मक वाटचाल करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रास्ताविक अनिल हेपट यांनी केले, तर संचालन जिल्हाध्यक्ष अनिल घाटे यांनी केले. आभार प्रदर्शन सुनील गेडाम यांनी केले. या परिषदेला विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींसह वणीतील सर्व तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

परिषदेच्या यशस्वीतेसाठी पंढरी मोहितकर, गणेश कळसकर, मोरेश्वर कुंटलवार, रवी गोरे, गजानन पैसटवार, पांडुरंग ठावरी, प्रा. धनंजय आंबटकर, अथर्व निवडिंग, प्रवीण आडे, ऋषी उलमाले, वासुदेव गोहणे, सुरेखा हेपट, शंकर केमेकार, राकेश खामणकर, दत्तू कोहळे, छाया गावंडे, प्रमोद पहूरकर, उत्तम गेडाम, दिनेश शिटलवार, मिलिंद रामटेके, शैलेंद्र कांबळे, एकनाथ रायसिडाम, प्रदीप नगराळे, आणि दिनेश पारखी यांसह किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या परिषदेतून शेतकरी समुदायाला बळकटी देण्याचा प्रयत्न झाला असून, आगामी आंदोलनांसाठी तयारी सुरू झाली आहे.



Comments are closed.