आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तिवारी यांची भेट

म्हैसदोडका व घोडदरा येथील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी 21 ऑगस्टरोजी मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका व घोडदरा येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत मारेगाव तालुक्यात आत्महत्येचे सत्र सतत चालू आहे. दरम्यान तालुक्यातील म्हैसदोडका येथे 9 ऑगस्ट रोजी मोनाली लक्ष्मण पारखी (29) या सुशिक्षित विवाहित महिलेने घरच्यांना शेतात जातो असे सांगून गावापासून 1 की.मी. अंतरावर असलेल्या बोधने यांच्या शेतात जाऊन आपल्या जय लक्ष्मण पारखी या तीन वर्षाच्या गोडस मुलाला साडीच्या पदराने बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. तसेच 20 ऑगस्ट रोजी ऐन तान्ह्या पोळ्याच्या दिवशी घोडदरा येथील वंदना गजानन धनवे (50) हिने सुद्धा विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. या दोन्ही घटना कौटुंबिक कलहातून घडल्याचे निष्पन्न होत असून तालुक्यात चालू असलेल्या या आत्महत्येच्या घटणेमुळे अवघा तालुका हादरला आहे.

किशोर तिवारी हे मारेगाव तालुक्यात दौऱ्यावर आले असता म्हैसदोडका येथील आत्महत्याग्रस्त पारखी कुटुंबाला व घोडदरा येथील धनवे या दोन्ही कुटुंबांना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. व त्यांना मदतीचे आश्वासन दिले. यावेळी अंकित नैताम, पत्रकार व गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.