कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारीविना

प्रतिनियुक्तीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वपदावर कायम करण्याची मागणी

0

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शेंडे यांना पूर्वपदावर नियुक्त करण्याची मागणी मुंगोली येथील आयुष रोहिदास ठाकरे यांनी केली आहे. डॉ. शेंडे मागील एका वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत आहेत.

कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 38 गावांचा समावेश आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये डॉ. अमित शेंडे यांची नियुक्ती वैद्यकीय अधिकारी प्रा.आ. केंद्र कोलगाव या पदावर करण्यात आली. परंतु मागील एका वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून त्यांना प्रतिनियुक्तीवर कायर येथे पाठविण्यात आले आहे.

सध्या कायर प्राथमिक आरोग्य केंद्रावर 4 वैद्यकीय अधिकारी असून कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकही वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे कोरोना महामारीच्या या काळात कोलगाव परिसरातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने डॉ. अमित शेंडे यांची प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करून त्यांना मूळ पदस्थापनेवर पाठविण्यात यावे.

अशी मागणी आयुष ठाकरे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ, तहसीलदार वणी, गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी व तालुका आरोग्य अधिकारी वणी याना ईमेलद्वारे पत्र पाठवून केली आहे.

हेदेखील वाचा

चिखलगाव रेल्वे गेट ते वरोरा रोड रेल्वे गेटपर्यंत सिमेंट रोड कामाला मंजुरी

हेदेखील वाचा

मुंगोली येथील ‘आशा क्लिनिक’ सुरु करण्याची मागणी

हेदेखील वाचा

राज्यातील दिव्यांगांचे लसीकरण प्राधान्याने व्हावे- स्माईल फाउंडेशन

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.