वणीत डेरा डालो आंदोलन, मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने

महाराष्ट्र किसान सभा व सीटूद्वारा आयोजन

0

जब्बार चीनी, वणी: शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहेत. देशभर जनता आंदोलन करीत असतानाही मोदी सरकार जनतेची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही, ह्या करिता ९ ऑगस्ट क्रांती दिनी शेतकरी कामगार एकत्रपणे देशव्यापी आंदोलन करण्यात आले. त्याच अनुषंगाने वणी येथेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सीटूच्या वतीने कॉ शंकरराव दानव यांचे नेतृत्वात भव्य धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आले. त्यानंतर विविध मागण्यांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सन २०१४ साली जनतेला अनेक आश्वासने देऊन केंद्रामध्ये सत्तेवर बसलेल्या मोदी सरकारने सत्तेवर बसताच जनविरोधी धोरणे, भांडवलदारी हितांची निर्णय घेत शेतकरी, कामगार, सामान्य जनतेला वेठीस धरीत अघोषित आणीबाणी लादून जनतेवर संविधान विरोधी कायदे तयार करणे सुरू केली आहे.

तीन काळे कृषी कायदे रद्द करा, वीज बिल विधेयक रद्द करा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, पिकविम्याचा लाभ विमा कंपनी ऐवजी शेतकऱ्यांना मिळावा, आशा-गतप्रवर्तक, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कामगार तसेच असंघटित क्षेत्रातील गरीब कामगारांना वेतनवाढ व सामाजिक सुरक्ष द्या, ४४ कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा,

बेघराचे पेंडिंग असलेले अर्ज निकालात काढून सर्व बेघरांना घरे देण्यात यावी, महसूल व गायरान जमिनीचे वाटप दि. १२ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा, वनाधिकार कायद्याच्या सुधारित नियम २०१२ नुसार वनहक्क मंजूर करा, वृद्धापकाळ व इतर निराधाराचे दरमहा २००० ₹ मानधन देण्यात यावे, इतर पारंपरिक वनवासी दावेदारांचे वनाहक्कांचे दावे मंजूर करा,

ज्या वनहक्क धारकांना पट्टे मिळाले आहे, त्यांना जमिनीची सुधारणा करण्यासाठी या कायद्याच्या तरतुदीनुसार आर्थिक मदत ताबडतोब करा, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची केलेली प्रचंड भाववाढ ताबडतोब कमी करावी, शेतकाऱ्यांवरील कर्ज सरसकट माफ करून किसान सन्मान योजनेचं सर्वांना लाभ देण्यात यावा, रेशन वितरण वायवस्था सुधारून प्रत्येक कुटुंबास ३५ किलो धान्य देण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन वणी येथील उपविभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने कॉ. शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. दिलीप परचाके यांचे नेतृत्वात करण्यात आली.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात कॉ. मनोज काळे, किसन मोहूरले, सुधाकर सोनटक्के, खुशालराव सोयाम, कवडू चांदेकर, रामभाऊ जिड्डेवार, अशोक गेडाम, ऋषी कुलमेथे, गजानन ताकसंडे, शंकर गौतरे, नंदकिशोर बोबडे, शिवा बंदूरकर, बबन चांदेकर, सुरेश शेंडे, विपलाव तेलतुंबडे, प्रीती करमरकर, अर्जुन शेडमाके,आदींनी सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले.

हे देखील वाचा:

‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे मंगळवारी शानदार उद्घाटन

स्वातंत्र्य दिन ऑफर: सोलर झटका मशिनवर 10 टक्यांची सुट

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.