आज ‘होटल दावत’ फॅमिली रेस्टॉरन्टचे होणार उद्घाटन

मान्यवरांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन, वणीकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खास शेफ दाखल

0

विवेक तोटेवार, वणी: वणीतील सुप्रसिद्ध 7 स्टार या ब्रॅन्डचे नवीन रेस्टॉरन्ट ‘होटल दावत’चे मंगळवारी शानदार उद्घाटन होत आहे. ‘दावत’ हे फुल्ली एसी व फॅमिली रेस्टॉरन्ट असून वणीकरांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पुणे, कोलकाता, दिल्ली येथून खास शेफ रेस्टॉरन्टमध्ये बोलवण्यात आले आहे. मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचे ग्रॅन्ड उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वेकोलिचे क्षेत्रीय महाप्रबंधक आईडी जंक्यानी, ठाणेदार वैभव जाधव, संजय देरकर उपाध्यक्ष य.जि बँक, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, शहरातील सुप्रसिद्ध डॉ. गणेश निमजे इ. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर लगेच रेस्टॉरन्ट सुरू होणार आहे.

वणी शहरात चांगलेच मुरलेले खवय्ये आहे. शिवाय पारंपरिक डिश सोडल्या तर त्यापेक्षा अधिक आणि नवीन डिश शहरात उपलब्ध नाही. स्पेशल शेफ उपलब्ध नसणे किंवा अप्रशिक्षित शेफ यामुळे नवीन डिश व टेस्ट खवय्याना मिळत नाही. फक्त चांगल्या टेस्टसाठी आणि नवीन डिशसाठी खवय्ये वणीतून चंद्रपूर, नागपूर, अदिलाबाद येथे जातात. तसेच फॅमिलीसाठी शहरात एकही नॉन व्हेज रेस्टॉरन्ट नाही. ही बाब लक्षात घेऊन वणीतील नगर पालिका जवळ ‘होटल दावत’ हे रेस्टॉरन्ट नव्याने सुरू करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पारंपरिकसह, स्पेशल शेफही या रेस्टॉरन्टमध्ये बोलावण्यात आले आहे. तसेच मुख्य म्हणजे तंदूरचे कोणतेही प्रकार वणीत मिळत नाही. या रेस्टॉरन्टमध्ये कायम तंदुरच्या सर्व डीश इथे उपलब्ध राहणार आहे.

व्हेज आणि नॉनव्हेज किचन वेगळे
वणीमध्ये फॅमिली रेस्टॉरन्ट तर आहे. मात्र हे सर्व रेस्टॉरन्ट व्हेज रेस्टॉरन्ट असल्याने नॉनव्हेज प्रेमींची चांगलीच निराशा व्हायची. जर फॅमिलीसह जेवायचे असेल किंवा पार्टी असेल तर बाहेरगावी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ही बाब लक्षात घेऊन रेस्टॉरन्टमध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे फॅमिली रेस्टॉरन्ट सुरू करणारे दावत हे पहिलेच फॅमिली रेस्टॉरन्ट ठरले आहे. विशेष म्हणजे येथे प्युअर व्हेजसाठी वेगळे किचन आणि आणि नॉनव्हेजसाठी वेगळ्या किचनची व्यवस्था करण्यात आली आहे.

फॅमिली पार्टी, मिटिंगसाठी वेगळा सुट
हॉटल दावत हे संपूर्ण एसी रेस्टॉरन्ट आहे. शिवाय स्पेशल ओकेशनसाठी फॅमिली व गृपसाठी इथे स्पेशल सुटची वेगळी व्यवस्थाही केली गेली आहे. यात कॉन्फरन्स तसेच फॅमिली पार्टी किंवा गृपपार्टी करता येणार आहे. याशिवाय देश विदेशातील सर्व डिश उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रासह, पंजाबी, बंगाली, मोघलाई, चायनिज, कॉन्टिनेन्टल इत्यादी डिश उपलब्ध राहणार आहे. विशेष म्हणजे उद्घाटनानिमित्त 20 टक्यांची सूट देखील खवय्यांसाठी देण्यात आली आहे.

मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता रेस्टॉरन्टचे उद्घाटन होणार असून उद्घाटनानंतर लगेच रेस्टॉरन्ट सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातील तसेच परिसरातील खवय्ये तसेच फॅमिलीने एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन रेस्टॉरन्टच्या संचालकाकडून करण्यात आले आहे.

पत्ता: हॉटल दावत, नगर पालिके मागे, जुन्या सेवन स्टार समोर, वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: 7020724715, 9423131737

Leave A Reply

Your email address will not be published.