कृषी संजीवणी योजना शेतकऱ्यासाठी की वीज वितरण कंपनीसाठी ?

योजनेचं आमिष दाखवून शेतक-यांकडून वीज बिल वसुली

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: सध्या मारेगावात वीज वितरण कंपनीच्या थकित वीज बिल वसुली मोहिम सुरु आहे. या दरम्यान दि. ११ नोव्हेंबरला एका फोटो स्टुडिओ व्यवसायिकाचा वीज वितरण कंपनीच्या वसुली अधिका-यासोबत वाद झाला आणि त्यातून अधिका-याला मारहाण करण्यात आली. वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपली वसुली करताना ग्राहकांनी बिलासंदर्भात विचारणा केली तर यावेळी बिल पूर्ण भरा पुढच्या वेळी बिल कमी येईल असं आश्वासन देऊन वेळ मारून नेण्याचं काम करत आहेत. पण एखाद्या ग्राहकाने सवाल जबाब केला तर वादाचा विषय होतो, त्यातूनच असे मारामारीचे प्रकार तर घडत असल्याचे ग्राहक सांगतात.

मुख्यमंत्र्यांनी १ नोव्हेंबरला शेतक-यांसाठी कृषी संजीवणी नावाची योजना जाहीर करुन शेतक-यांचे बिल १५ नोव्हेंबर पर्यत विजवितरण कंपनीने कापू नये असे आदेश काढले. मात्र मारेगाव तालुक्यातील शेतकर्यांच्या कृषीपंपाचे कनेक्शन कापण्यातक आल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. वीजवितरण कडून थकीत वीज बिल भरले तरच तुम्हाला कृषि संजीवणीचा फायदा होईल असे सांगितले जात आहे. पण कृषिपंपाच्या बिलाची रक्कम डोळे पांढरे करणारी आहे.

मारेगाव तालुक्यात कापूस आणि सोयाबिन हेच मुख्य पिक असल्याने वीज ही काही मर्यादित कालावधी साठीच आवश्यक असते, पण तालुक्यातील शेतकर्यांना बिल मात्र हजार, लाखाच्या घरात येत आहे. त्यामुळे ही शासनाची कृषिसंजीवणी योजना शेतकर्या च्या फायद्याचि की वीज वितरण कंपणीच्या असा प्रश्न शेतकर्याना पडत आहे,

सध्या कपासीला व तुरी आणि रब्बी हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकर्यांना विजेची गरज असते पण आजही तालुक्यातील शेतकर्याच्या शेतातील वीज बंद असल्याचं अनेक शेतकरी सांगतात. तसेच वीज ही रात्रीच्या वेळेला येत असल्याने त्याचा फायदा होत नाही अशीही ओरड शेतकर्यांमध्ये आहे. त्यामुळे फक्त शेतक-यांकडून थकीत वीज बिल वसूल करण्यासाठी तर ही योजना आणली नसावी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.