धक्कादायक ! महिलेची अश्लिल व्हिडीओ क्लिप काढून शारीरिक शोषण

आरोपीची काँग्रेस पक्षाशी जवळीक, परिसरात एकच खळबळ

0

विवेक तोटेवार, वणी: एका विवाहित महिलेला प्रेमाच्या पाशात अडकवून तिची व्हिडीओ क्लिप काढून तिचं शारीरिक शोषण केल्या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोषण करून बॅकमेल करणा-या व्यक्तीचा काँग्रेस पक्षाशी जवळचा संबंध असून सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्याचा चांगलाच वावर आहे. त्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

वणीत राहणारा आरोपी भास्कर गोरे याने वणीतीलच एका विवाहित महिलेशी सुत जुळवलं. त्यानंतर तो तिचं तीन वर्षांपासून शारीरिक शोषण करत होता. पुढे त्या महिलेनं त्याच्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला. तेव्हा आरोपीनं त्याच्याजवळ असलेली महिलेची अश्लिल क्लिप आणि फोटो समाजात व्हायरल करण्याची धमकी दिली. केवळ इतक्यात आरोपी थांबला नाही तर त्याने महिलेला ब्लॅकमेल करत तिच्याकडून 3 लाख 75 हजार रुपयेही उकळले. अशी फिर्याद पीडित महिलेनं नोंदवली आहे.

आरोपी सुरुवातीला महिलेला प्रगतीनगर येथील खोलीत बोलावत होता. त्यानंतर तो पीडित महिलेला गरज असलेल्या ठिकाणी बोलावून तिचं शारीरिक शोषण करायचा. जर महिलेनं येण्यास नकार दिला तर तो तिच्या मुलीला आणि पतीला जिवे मारेल अशी धमकी देत होता. अखेर महिले भितीपोटी आरोपी सांगेल तसे करत होती. जेव्हा आरोपीचा त्रास वाढला तेव्हा तिने ही घटना पतीस सांगून पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

आरोपीवर सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला रात्री दीड वाजता पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी भास्कर गोरे याच्यावर कलम 376 (2) (एन), 354(सि), 387, 506 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उप निरिक्षक घडामोडे पुढील तपास करीत आहे.

(हे पण वाचा: नगर पालिकेच्या चाळीतच भरतोय मटक्याच्या बाजार)

आरोपी भास्कर गोरेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगलाच वावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो काँग्रेस या पक्षामध्ये काम करत होता. त्याचं हे प्रकरण समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.