कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शिवसेनेचे गजानन बेजंकिवार

बेजंकीवार यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक

0

अयाज शेख, पांढरकवडा: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सभापती पदासाठी सोमवारी निवडणूक घेण्यात आली. या सभापती निवडणुकीसाठी पालकमंत्री ना. संजय राठोड, माजी मंत्री शिवाजीराव मोघे व सलीम खेताणी गटाकडून शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य माजी अर्थ व बांधकाम सभापती गजानन बेजंकीवार यांचे अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र पारवेकर गटाकडून कोणत्याही हालचाली किंवा कोणताही इच्छुक उमेदवार समोर आला नसल्याने गजानन बेजनकीवार यांची बाजार समिती सभापती पदासाठी बिनविरोध निवड झाली.

मागील निवडणुकीत १८ संचालक मंडळापैकी १२ संचालक हे काँग्रेस, शिवसेना, भाजपा (अण्णासाहेब पारवेकर गट) युतीचे निवडून आले होते. तर भाजप, काँग्रेस बंडखोर यांनी सलीम खेतानी गटासोबत युती करीत ६ संचालक निवडून आले होते. १२ संचालक असल्याने त्यावेळी अण्णासाहेब पारवेकर गटाचे जान मोहम्मद गीलानी हे सभापतीपदी निवडून आले होते. परंतु काही दिवसांनी सभापती गीलानी यांचे संचालक मंडळातील काही सदस्यांसोबत मतभेद झालेत.

विधानसभा निवडणुकीत पारवेकर गट हा काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांच्या विरोधात होता. त्यामुळे शिवसेना काँग्रेस व सलीम भाई खेतानी यांचा गट एकत्रित येत सभापती जान मोहम्मद गिलानी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. तो प्रस्ताव २४ जुलै रोजी १३ विरूद्ध शून्य मत्तांनी पारित झाला होता.

सोमवारी झालेल्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी काम पाहिले. या सर्व निवडप्रक्रिया सलीम भाई खेतानी, अमर पाटील, जितेंदरसिंह कोंघारेकर यांच्या नेतृत्वाखाली झाल्यात. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, बाळासाहेब मोघे, राजेंद्र गायकवाड, साजीद शरीफ, आतीश चव्हाण, मनोज राय, राजू खैर, रवी बोरेले व इतर संचालक उपस्थित होते…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.