झरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार
पंचायत समिती सभापती गोंड्रावार यांची पीआरसी पथकाला तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये विविध कामात व निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार पीआरसीच्या चमुला पंचायत समितीचे सभापती यांनी देऊन सखोल चौकशी करून कार्यवाहीची मागणी केली आहे. तालुक्यातील कमळवेल्ली, सतपेल्ली, पाटण, माथार्जुन, मार्की, पांढरवाणी, कारेगाव, दाभाडी, खरबडा, अडकोली, बोपापुर व भेंडाळा या गावाचा यात समावेश आहे.
सतपेल्ली येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचा निधी तेथील सरपंच व सचिव अफरातफर केल्याचे चौकशी दरम्यान सिद्ध झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प. अध्यक्षा महोदयासमोर सभापती यांनी प्रश्न मांडले होते. ग्रामपंचायत कमळवेल्ली येथील १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत तेथील सार्वजनिक विहीरीतील गाळ न उपसताच १ लाख ९० हजार रुपयांची तत्कालीन सरपंच व सचिव उचल केल्याचे गावकऱ्यांच्या तक्रारीवरून निदर्शनास आले.
माथार्जुन येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांचे १ ते ४ जोडप्रस्ताव जि.पं. यवतमाळ येथे पाठवुनही आजपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही हेही प्रश्न जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आले. जिल्हा परिषद यवतमाळ येथे चौकशी अहवाल सादर करूनही अद्यापही कार्यवाही न झाल्याबाबत पीआरसी च्या चमुला निवेदन देण्यात आले.
ग्रामपंचायत कमळवेल्ली येथील १४ वा वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्याव तंटामुक्त कामाचे चौकशी अहवाल उप मुख्यकार्यकारी (पंचायत) सादर करून शुद्ध अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. ग्रामपंचायत माथा्जुन येथील तत्कालीन ग्रा.वि.अ. यांचा जोडपत्र १ ते ४ चा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही सदर ग्रा.वि.अ. यांचे विरूध्द कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही.
ग्रामपंचायत सतपल्ली येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अफरातफर बाबत चौकशी अहवालानुसार तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस देण्यायत आली आहे. परंतु सदर ग्रामसेवक यांनी खुलासा अजून पर्यंत सादर केले नाही. याबत जिल्हा परिषद यवतमाळ येथे पत्र देण्यात आले आहे. ग्रामपंचायत पाटण येथे १४ वा वित्त आयोगा अंतर्गत कामाची सखोल चौकशी करण्यात यावी.
झरी जामणी तालुक्याती ९०% ऑरो मशिन बंद अवस्थेत आहे. तसेच तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत अंगणवाडी दुरूस्ती करीता १.०० लक्ष रूपये निधी प्राप्त होवुन सुध्दा सदर ग्रामपंचायतीने निकृष्ठ दर्जाचे काम केले आहे. तरी सदर ग्रामपंचायतीची चौकशी करण्यात यावी. वरील सर्व विषयाच्या संदर्भात पीआरसी यांनी सखोल चौकशी करून कार्यवाही करावी, अशी तक्रार सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी पीआरसीच्या चमुला घाटंजी येथे दिली.
हे देखील वाचा:
सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण