पिंपरी येथील विश्वासराव मोकाशी यांचे निधन

बैतुल येथे हृदयविकाराच्या धक्याने निधन

0

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील पिंपरी (कायर) येथील विश्वासराव मारोतराव मोकाशी यांचे दि. 21 रविवारी पहाटे बैतुल मध्यप्रदेश येथे हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. ते आयुध निर्माण फॅक्टरी चांदा (भद्रावती) येथील सेवानिवृत्त लेखाअधिकारी होते. सेवानिवृत्ती नंतर ते ड्रीमलँड सिटी गणेशपूर येथे वास्तव्यास होते.

नुकतेच ते बैतुल येथे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीला असलेल्या मुलाकडे पत्नीसह काही दिवसांसाठी राहायला गेले होते. रविवारी पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपचारासाठी रुग्णालयात नेताना वाटेतच हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पार्थिवावर गणेशपूर (वणी) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी मायाताई, मुलगा मकरंद, सून, भाऊ विवेक, भावजय आणि बराच आप्त परिवार आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

झरी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भष्टाचार

Leave A Reply

Your email address will not be published.