लीलाबाई मारोती आसूटकर अनंतात विलिन

नागपूर येथे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन

जब्बार चीनी, वणी: वणीतील गुरुनगर येथील रहिवाशी असलेल्या लीलाबाई मारोती आसूटकर यांचे शुक्रवारी सकाळी नागपूर येथे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथील एका खासगी उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते. मात्र शुक्रवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर दुपारी अडेगाव येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगी ललिता चंद्रभान ढवस, नातू अर्जुन प्रफुल्ल ढवस, प्रीशा प्रफुल्ल ढवस, स्वरांश सुहास मिलमिले, अद्विका सुहास मिलमिले व बराच मोठा परिवार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.