बहुगुणी डेस्क, वणीः रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमण्ड सिटी वणी आणि द टीम क्रू डांस स्टुडिओने देशभक्तीगीतांवर आधारित आंतरशालेय समूहनृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथील लर्नर्स इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अव्वल येऊन बाजी मारली.या विद्यार्थ्यांनी पारंपरिक बांबूनृत्य यावेळी सादर केले. उकृष्ट अशा अस्सल सादरिकरणाने परीक्षकांसह उपस्थितांची मने या नृत्याने वेधली
लर्नर्स इंटरनॅशनल स्कूल ही आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील मांगरूळ येथे आहे. संस्थेचे संचालक डॉ. महेंद्र अमरचंदजी लोढा, डॉ. गणेश संभाजी लिमजे, डॉ. सुनीलकुमार नीलकंठ जुमनाके, डॉ. रमेश रामचंद्र सपाट, डॉ. महेश अशोकराव सूर, डॉ. प्रशांत भानुदास तामगाडगे, डॉ. नीलेश राधेश्याम अग्रवाल, विशाल वर्धमान गोलेछा या संचालकमंडळाने यशस्वी गुणवंतांचं अभिनंदन केलं.
डॉ. महेंद्र लोढा हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात आहेत. आदिवासी क्षेत्रांत त्यांचं कार्य प्रचंड मोठं आहे. आरोग्य, शिक्षण अशा अनेक घटकांवर ते प्रत्यक्ष कार्य करीत असतात. मारेगावसारख्या आदिवासीबहूल भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून ते व संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नरत असते. शिक्षणासोबतच कला, साहित्य, क्रीडा व विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना रुची वाढावी म्हणून त्यांचा प्रयत्न असतो. वर्षभर विविध उपक्रम शाळेद्वारे घेतले जातात. शाळेच्या मुख्याध्यापिका शिवाणी दास यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले. सर्व शिक्षकांनी या नृत्यासाठी सहकार्य केले.