रंगारीपुरा येथे कोसळली वीज, विद्युत उपकरणांचे नुकसान

वणीत संध्याकाळी विजेचा कडकडाट मुसळधार पाऊस

जितेंद्र कोठारी, वणी: सोमवारी संध्याकाळी वणीत व परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे 1 तास हा पाऊस सुरू होता. दरम्यान रंगारीपुरा येथील सेवानिवृत्त अधिकारी मधुकरराव लामगे यांच्या घरावर संध्या. 6.30 वाजताच्या सुमारास विज कोसळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी त्यांच्या घरातील व त्यांच्या शेजारील घरातील इलेक्ट्रिक उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लामगे यांच्या घरातील एलईडी टीव्ही, सेट टॉप बॉक्स, 4 फॅन या उपकरणांचे नुकसान झाले आहे. तर त्यांच्या शेजारी असलेले शिवम अनिल दानव यांच्या घरातील 2 फॅनचे नुकसान झाले आहे. शिवाय इतर घरीही विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा:

मुकुटबन रोडवर अपघाताची मालिका- अडेगाव येथील तरुण गंभीर

जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Comments are closed.