पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे द्वारा नुकतीच शिष्यवृत्ती परीक्षा झाली. त्यात वणी लायन्स हायस्कूलच्या तब्बल 23 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या या परीक्षेत इयत्ता पाचवीचे 14 तर इयत्ता आठवीचे 9 असे एकुण 23 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आध्या देवगडे, आराध्य गोहोकार, आरोही खैरे, हेमाश्री कोटरंगे, इंद्रायणी सिंग्रुप, मृणाली गोवरदीपे, पार्थ निमसटकर, राणी भालेराव, सौम्या आवारी, सावरी थोरात, श्रुत वाघ, स्मिरल डहाके, तेजस चिकटे, तेजेश्वर खुसपुरे, अनुश्री खिरेकर, अस्मि विकटे, मदिहा शेख, निधी चैदे, पूर्वी साळुंके, राधा कुल्दीवार, सेहर शेख, त्रिशा दुमणे हे ते यशस्वी विद्यार्थी आहेत. या घवघवीत यशाचे कौतुक विद्यालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार, उपाध्यक्ष बलदेव खुंगर, विद्यालयाचे सचिव सुधीर दामले, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पायडकर, अकॅडमीक डायरेक्टर प्रशांत गोडे व प्राचार्य चित्रा विवेक देशपांडे यांनी केले आहे. विद्यार्थी आपल्या यशाचं श्रेय आई-वडील, शिक्षक व प्राचार्या चित्रा देशपांडे यांना देत आहेत. या यशासाठी विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.


Comments are closed.