विवेक तोटेवार, वणी: सध्या राज्यभरात कोरोनामुळे बिअरबार आणि वाईन शॉप बंदचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व बार आणि शॉप बंद आहेत. यायाच फायदा घेऊन चोरट्याने काल रात्री वणी येथील एक बिअर बार फोडले. यातील एकून 50 हजारांच्या वेगवेगळ्या ब्रँडच्या दारू चोरट्यांने लंपास केल्याची माहिती आहे. वणी उपविभागात बार फोडल्याची एका आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.
वणीतील मंजुषा असं या फोडलेल्या बारचं नाव असून हा बार तलाव रोड (लालगुडा) येथे आहे. वणीत हा बार चौपाटी या नावाने परिचित आहे. या बारमधून साडे सात पेटी विदेशी दारू चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मंगळवारी रात्री पोलिसांना पेट्रोलिंग करताना हा बार फोडल्याची शंका आली. याबाबत त्यांनी बार मालक प्रसाद पुल्लूरवार यांना माहिती दिली. पण ते बाहेरगावी असल्याने ते रात्री येऊ शकले नाही.
बुधवारी सकाळी ते गावावरून परत आले व त्यांनी बारची पाहणी केली असता त्यांना टेरिसवरील पारापेट तोडून टीन वाकवून चोरट्यानी बारमध्ये प्रवेश केला. खाली उतरणल्यानंतर त्यांना शटरचा अडथळा येत होता. त्यामुळे त्यांनी शटरचे कुलूप तोडले व आता प्रवेश केला. बारमध्ये असलेल्या गोदामाचे कुलूप तोडून त्या ठिकाणून त्यांनी विदेशी दारूच्या पेट्या नेला. अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
सध्या या प्रकरणी पोलीस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू असून सुमारे 50 हजारांचा माल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा बार दारुड्यांनी फोडला की अवैध दारू विक्रेत्यांनी याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. राज्यात बार व वाईन शॉप बंद असल्याने दारुड्यांनी वाईन शॉप व बार फोडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Corona | नागपुरातील एका बिअर बारमध्ये चोरी करताना 2 चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद. #Lockdown #Nagpur pic.twitter.com/nOch9TR690
— Sanjay Patil (@patil23697) April 2, 2020
क्राईम रेट घसरला पण….
सध्या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे क्राईम रेट पूर्ण घसरला आहे. भांडण, मारामारी, खून यासारख्या घटना जवळपास बंद झाल्या आहेत. मात्र दारू संबंधीत घटना यात अधिक प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या आठवड्यातच वणी उपविभागातील झरी येथील राहुल बार चोरट्यांनी फोडला होता. त्यातील 33 हजारांचा माल चोरट्यांनी नेला होता. त्या प्रकरणात अद्याप आरोपींना अटक होण्याच्या आतच आता वणीमध्ये बार फोडण्याची घटना घडली आहे. त्यासोबतच अवैध दारू विक्रीच्या घटनाही समोर येत आहे आहे.
(*गुन्हा दाखल होताच न्यूज अपडेट केली जाईल)