वणीतील मंडईत सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

भाजी मंडईत लोकांनी केली एकच गर्दी

0

जब्बार चीनी वणी: संपूर्ण जगात धुमाकूळ घालणा या जीवघेण्या कोरोना विषाणूला प्रतिबंध घालता यावा म्हणून संपूर्ण भारतात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले. प्रशासन अंमलवजावणीसाठी पूर्ण ताकद लावत असताना , वणीतील नागरिक ही वाव गांभीर्याने घेतलेली नसून, सोशल डिस्टन्सिंगचा येथे फज्जा उडाला आहे. प्रशासनसुद्धा अशा नागरिकांसमोर हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

वणी येथील भाजीमंडी आजपासून (रविवार) कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात स्थलांतरीत करण्यात आली. नागरिकांनी आज भाजीपाला घेण्यासाठी तोबा गर्दी केली. मात्र इथे सोशल डिस्टन्सिंग कुठेही पाळण्यात आले नाही. अनेकांनी तर चेह यावर मास्कसद्धाघातले नव्हते. दोघांमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन केले होते. सर्वजण नियम तोडून एक-दुस याला खेटूनच उभे होते. एकूण सर्वच ठिकाणी नियमांची पायमल्ली होताना दिसून आले.

गर्दी होण्याची कल्पना असूनही नगर पालिकेचे दुर्लक्ष 

कोरोना विषाणु गर्दीमुळे पसरतो. त्यामुळे गर्दी टाळण्याच्या सक्त सूचना केंद्र व राज्य शासनाने दिले आहे.  शहरात त्यासाठी नियोजन नगरपरिषदेने केले आहे. तीन दिवसांनी भाजी मंडई सुरू होणार आहे, त्यामुळे इथे एकच गर्दी होणार याची पालिका प्रशासनाला कल्पना होती. मात्र त्यानंतरही नगरपालिकेने या बाबीकडे गंभीर्याने बघितले नाही. परिणामी सर्व लॉकलाऊन आणि संचारबंदीची मेहनत पाण्यात जातानाचे चित्र दिसून आले.

नागरीकांमध्ये कारोना विषाणूबाबत भीती उत्पन्न झाल्यानंतरच काही प्रमाणात ते नियमांचे पालन करतील. मात्र तोपर्यंत किती जण संशयित म्हणून विळख्यात येतील याबाबत भीती व्यक्त होत आहे. ‘वणी बहुगुणी’ने याबाबत फोटो काढून एसडीओंना कल्पना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचे आदेश देणार अशी प्रतिक्रिया दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.