शेतकऱ्याला भुरळ घालून लुटणाऱ्या भामट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील सुकनेगाव येथील शेतकऱ्याला बुधवारी भुरळ घालून दोन चोरट्यानी लुटले. दुपारी झालेल्या या चोरीची पोलिसांना तक्रार मिळताच पोलिसांनी सायंकाळी दोन्ही चोरट्याना जेरबंद केले आहे.

प्रदीप नानाजी ताजने (32) रा. सुकनेगाव हे भाजीपाला विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्या शेतीतील भाजीपाला विकल्यानंतर ते नेहमीप्रमाणे दुपारी 12 वाजताच्या सुमारास घरी आले. त्यावेळी घरी दोन इसम साधूच्या वेषात आले होते. त्यांनी दक्षिणा मागितली प्रदीपच्या पत्नीने त्यांना 5 रुपये दक्षिणाही दिली. त्यानंतर तुमच्या घरात लवकरच एकाचा मृत्यू होणार अशी भविष्यवाणी या भामट्यांनी केली. त्या भामट्यांनी प्रदीपच्या परिवारास प्रसाद दिला.

प्रसाद खाताच त्यांना गुंगी आली. भुरळ घातल्यासारखे त्यांना पैसे आणून द्या म्हणून म्हटले असता 16 हजार रुपये दिले. काही वेळ घालविल्यानंतर ते भामटे तेथून पसार झाले. थोडा वेळाने गुंगीच्या औषधाचा परिणाम संपताच त्यांना समजले की, आपली फसवणूक झाली आहे.

प्रदीपच्या भावाला हे समजताच त्याने प्रदीपसमवेत मारेगाव(कोरंबी) फाट्या पर्यंत येऊन पाहिले परंतु चोरट्याचा शोध लागला नाही. वणीतील दीपक चौपाटी परिसरात पाहिले शोधाशोध घेतला परंतु चोरटे मिळाले नाही.

शेवटी त्यांनी वणी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी लगेच सूत्र हलविली व वणीतील आय टी आय कॉलेज समोर दोघांही आरोपी तपन सीताराम एकनाथ (20) रा. शेलु तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर व सुनील बाबूलाल यादनेश्वर (21) रा. खैरी तालुका काटोल जिल्हा नागपूर यांना पकडले.

त्यांच्यावर कलम 420, 328, 506, 34 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पो.उ. नि. विजयमाला रिठे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.