रंगनाथच्या निवडणुकीत झाले फक्त 35 टक्के मतदान
मारेगाव केंद्रावर सर्वात जास्त 57 टक्के तर वरोऱ्याला फक्त 17 टक्के मतदान... मतदार यादीत घोळ, हजारो मतदार मतदानापासून वंचित
जितेंद्र कोठारी, वणी : येथील रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या 17 संचालकांसाठी रविवार 26 जून रोजी मतदान संपन्न झाले. प्रतिष्ठेचे व अटीतटीच्या असलेल्या या निवडणुकीत फक्त 35 टक्के मतदान झाले. मारेगाव मतदान केंद्रावर सर्वात जास्त 57.37 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी वरोरा मतदान केंद्रावर फक्त 17.53 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. या निवडणुकीत जय सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी लढत होती.
रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात एकूण 14 शाखा कार्यरत आहे. सर्व शाखांचे 36187 मतदार मतदानास पात्र होते. मात्र आज झालेल्या निवडणुकीत फक्त 12696 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वणी येथे 5 मतदान केंद्रावर 10183 मतदारांपैकी 4466 (48.85℅) मतदारांनी मत टाकले.
मारेगाव(57.37), मुकुटबन (44.36), घाटंजी (45.67), वरोरा (17.53), गडचांदूर (21.94), चंद्रपूर (35.25), राजुरा (27.94), मुल (30.43), भद्रावती (20.15), चिमूर (48.81), यवतमाळ (19.08), आर्णी (37.21) व ब्रम्हपुरीत (44.86) टक्के मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मताधिकार बजावले. वणी शहरात बूथ क्रमांक 4 वर सर्वात जास्त 295 मत तर बूथ क्रमांक 15 वर सर्वात कमी 86 मत पडले. आज झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार 27 जून रोजी सकाळी 8 वाजता पासून बाजोरिया हॉल वरोरा रोड वणी येथे होणार आहे.
मतदार यादीत घोळच घोळ ..!
या निवडणुकीत मतदार यादीमध्ये अनेक घोळ असल्याचे दिसून आले. अनेक मतदारांचे नाव मतदार यादीत नव्हते, तर शेकडो मतदारांचे भाग क्रमांक चुकीचे असल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली. ग्रामीण भागातुन मोठ्या उत्साहाने मतदानासाठी आलेल्या मतदारांच्या पदरी मात्र निराशा आली. मतदान याद्यात नावचं नसल्यामुळे गोंधळ उडाला. सदोष मतदार यादीमुळे मतदानाची टक्केवारी घसल्याचा आरोप परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आशिष खुलसंगे यांनी केला आहे
Comments are closed.