महसूल प्रशासनातर्फे मतदार दिन साजरा.

0

वणी: वणी येथील महसूल प्रशासनातर्फे दि. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन बक्षिस वितरण करण्यात आले. त्यासोबत सकाळी जनजागृती रॅली काढून नवागतांना मतदार ओळखपत्र वितरित करण्यात आले. मतदार दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला माजी कुलगुरू डॉ.भालचंद्र चोपणे, तहसीलदार रविंद्र जोगी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करू दिली.रॅलीच्या समारोप प्रसंगी तहसीलदार रविंद्र जोगी यांनी मार्गदर्शन करून आभार मानले. व उपस्थितांना गजानन कासावार यांनी मतदानाची शपथ दिली.

महसूल भवन मध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार रविंद्र जोगी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी राजेश गायनर, नायब तहसीलदार विवेक पांडे, नारायण गोडे, जेसीआइ चे राहुल सुंकुरवार, सौरभ बरडीया, उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक पांडे यांनी केले.

याप्रसंगी राजेश गायनार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. त्यानंतर चित्रकला स्पर्धेतील प्राची काळे लायन्स स्कूल, ऋत्विक चौधरी व साक्षी माथनकर दोन्ही जनता विद्यालय वणी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात आली. निबंध स्पर्धेमध्ये लायन्स स्कूलची सोनिया भांगडे, विवेकानंद विद्यालयाची निकिता खाडे व शाहू महाराज हिंदी विद्यालयाची कोमल मंडल ह्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस देऊन गौरविण्यात आले. ही सर्व बक्षिसे जेसीआई या स्वयंसेवी संस्थेने प्रायोजित केली होती.

अध्यक्षीय भाषण करताना रविंद्र जोगी यांनी मतदानाचे महत्व समजावून सांगितले. व देश सुदृढ व समृद्ध करण्यासाठी निकोप मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या केंद्र स्तरीय मतदान अधिकाऱ्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कासावार यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.