शेतातील बांध फुटून पिंपरी-बाबापूर शेतशिवारात पिकांचे मोठे नुकसान

शनिवारी रात्री तालुक्यातील काही भागात धुंवाधार पाऊस, नुकसानीची पाहणी करण्याची मागणी

0

तालुका प्रतिनिधी: कायर परिसरातील पिंपरी, बाबापूर, बोरगाव शिवारात शनिवारी रात्री धुंवाधार पाऊस पडला. अवघ्या दीड ते दोन पडलेला पाऊस हा ढगफुटी सदृष्य असल्याचे बोलले जात आहे. या पावसामुळे शेतं खरडून निघाले आहे. तर शेतातील बांध फुटल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. महसूल विभागाने पिक नुकसानीची पाहणी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शनिवारी रात्रभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले. 

वणी तालुक्यात शनिवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. शनिवारी रात्री संपूर्ण तालुक्यात सर्वदूर पाऊस झाला. मात्र, पिंपरी, बाबापूर, बोरगाव परिसरात रात्री विजांच्या कडकडाटासह दिड – दोन तास ढगफुटी सदृष्य पाऊस पडला. या पावसात पिंपरी येथील कल्पना संजय आसुटकर यांचे शेत गट क्र. 136/2 मधील मोठा बांध फुटला. परिणामी शिवारातील पाणी शेतातून वाहून सोयाबीन, तुर पिकाचे नुकसान झाले.

पिंपरीच्या बेघर वस्तीत घरात पाणी शिरले. यामुळे झोपेत असलेल्या नागरिकांची धांदल उडाली. बोरगाव येथील विठ्ठल काळे, गीता बंडू हंसकर यांच्या शेतातील बांध फुटून पिकांचे नुकसान झाले. तर बाबापूर येथील पंचधार नाल्याचं पाणी शेतात शिरून संतोष घोंगे यांच्या शेत गट क्र. 3/3 या शेतातील कापूस पिकांचे नुकसान झाले.

बाबापूर येथील संतोष घोंगे यांचे शेत

या जोरदार पावसामुळे नाले-ओढे दुथडी भरून वाहून गेले. तर पिंपरी येथील तलाव 75 टक्के भरला. महसूल विभाग व कृषी विभागाला याबाबत ‘वणी बहुगुणी’ने विचारणा केली असता अद्याप नुकसानाची कोणतीही माहिती आली नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. महसूल विभागाने सदर नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक-यांची आहे.

हे देखील वाचा:

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: मेंढोली-वरझडी मार्गाच्या दुरवस्थेची दखल

निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.