वणी बहुगुणी इम्पॅक्ट: मेंढोली-वरझडी मार्गाच्या दुरवस्थेची दखल

सोमवारी पाईप बदलून देण्याचे व लवकरच डांबरीकरणाचे आश्वासन

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली-वरझडी या चार किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाल्याची बातमी ‘वणी बहुगुणी’वर प्रकाशित झाली होती. त्याची प्रशासनाने दखल घेत शनिवारी मेंढोली रस्त्यावरील जीवघेणा खड्डा बुजवण्यास ठेकेदारास पाठविले. मात्र गावक-यांनी तात्पुरती मलमपट्टी नको म्हणत खड्डा बुजवण्याचे काम बंद केले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवार किंवा मंगळवारी पाईप बदलून देण्याचे मान्य केले. तसेच निधी प्राप्त होताच डांबरीकरणाच्या कामाला सुरूवात केली जाईल असे आश्वासनही दिले. मेंढोलीचे सुजाण नागरिक मनोज काळे यांनी ही समस्या ‘वणी बहुगुणी’ला पाठवली होती.

मेंढोली ते वरझडी हे 4 किलोमीटरचे अंतर आहे. मेंढोलीहून वणीला जाण्यासाठी देखील हा शॉर्टकट आहे. या मार्गाने वणी 16 किलोमीटरचे अंतर असून शिरपूर मार्गे हे अंतर 4 किलोमीटर अधिक आहे. त्यामुळे या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. शिवाय कायरला जाण्यासाठीही याच शॉर्टकटचा वापर केला जातो. वरझडी येथील सुप्रसिद्ध देवीसाठीही शिंदोला मार्गावरील गावावरून येणा-या भाविकांना याच मार्गाचा वापर करावा लागतो.

मात्र मेंढोली ते वरझडी हा रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरले जाते. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी स्वारांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. 8 महिन्याआधी या बाबात जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले होते. मात्र संबंधीत विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते.

‘वणी बहुगुणी’चे मानले आभार
‘वणी बहुगुणी’मध्ये शुक्रवारी दिनांक 9 जुलै रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत बातमी प्रकाशित झाली होती. त्यानंतर प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल मेंढोली येथील रहिवाशांनी ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले. सोमवारी किंवा मंगळवारी नवीन पाईप टाकण्यात येणार आहे. मात्र दागडुजी करणे ही केवळ मलमपट्टी असून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे अशी अपेक्षा गावक-यांनी व्यक्त केली आहे. 8 महिन्याआधीही याबाबत तक्रार करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. यावेळीही अशीच दिरंगाई झाल्यास मोठे आंदोलन उभे केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

‘समस्या’ या सदराबाबत आवाहन…

वणी बहुगुणीच्या सर्व वाचकांना आवाहन आहे की हल्ली पावसाचे दिवस सुरु आहे. आपल्या गावात, परिसरात वाराधुंद, पाऊस, अतिवृष्टी, पूर तसेच वीज पडून हानी, पिकांचे नुकसान होते. याशिवाय रस्त्याची दुर्दशा होते. याबाबत आम्हाला लगेच कळवा. आपल्या मोबाईलद्वारे फोटो, व्हिडीओ काढून माहितीसह आमच्या व्हाट्सएप नंबरवर पाठवा. याशिवाय तुमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या, लोडशेडिंग व इतर काही समस्या व तक्रार असल्यास आम्हाला माहिती द्या. आम्ही प्रशासनापर्यंत तुमची समस्या पोहचविण्यास मदत करु.
टीप: फोटो, व्हिडीओ काढताना मोबाईल आडवा धरून काढावा.

खालील क्रमांकावर माहिती द्या:-
संपादक: निकेश जिलठे 9096133400
वणी तालुका:
जितेंद्र कोठारी: 9423436056
जब्बार चिनी: 9822238748
विवेक तोटेवार: 9765100974
पुरुषोत्तम नवघरे: 9689181702
शिरपूर विभाग:
विवेक पिदूरकर: 9764426365)
मारेगाव तालुका:
भास्कर राऊत: 9420121311
झरीजामणी तालुका:
सुशील ओझा 9767279154

हे देखील वाचा:

निर्गुडा नदी दुथडी भरून वाहू लागली, नदीप्रेमींचे पावले नदीकडे

वीजचोरी करणे पडले महागात, ठोठावला 27 हजारांचा दंड

Leave A Reply

Your email address will not be published.