जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील जैन ले आऊट शेजारी असलेल्या फाले ले आऊट येथे एका वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मृतदेह घराच्या रेलिंगवर लटकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. बळीराम जयराम वेलेकर (वय अंदाजे 95) असे मृतकाचे नाव आहे. ते आजारपणामुळे त्रस्त होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
फाले ले आऊट येथे मृतक बळीराम यांचे एक मजली घर आहे. तळ मजल्यावर त्यांचा मुलगा तसेच नातवंड राहतात तर पहिल्या मजल्यावर मृतक त्यांच्या पत्नीसह राहायचे. रविवारी रात्री घरी सर्व झोपले असताना त्यांनी घराच्या रेलिंगच्या ग्रीलला दुपट्टयाच्या साहाय्याने गळफास घेतला.
पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. ते कॅन्सर या रोगाने त्रस्त होते. आजारपणामुळे त्रस्त झाल्याने ते गेल्या अनेक दिवसांपासून ते जगायचे नाही असे म्हणत होते, अशी माहिती आहे. त्यामुळे आजारपणातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.
हे देखील वाचा:
प्रशिक्षणाच्या नावाखाली वणीत बेकायदेशीररित्या गरब्याचे आयोजन
Comments are closed.