विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू

0

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी सकाळी वांजरी येथे काम करीत असताना खाजगी इलेक्टरीशियन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुभाष पांडुरंग पेंदोर वय (30) राहणार वांजरी हा इलेक्ट्रिक फिटिंग व मोटार दुरुस्तीचे काम करतो. मागील 15 वर्षांपासून तो सदर काम करीत आहे. मुळचा मजरा येथील राहवासी असणारा सुभाष हा आता वांजरी येथेच स्थायी झाला. तिथे तो आपल्या पत्नी व मुलांसोबत राहायचा. त्याचे वडील पांडुरंग पेंदोर व दोन भाऊ हे मजरा येथेच राहतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास सुभाष वांजरी येथे कवडू लडके यांच्या घरी तो काम करीत होता. काम करताना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. सुभाषाला त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

सुभाषच्या अकस्मात मृत्यूने त्यांच्या कुटुंबाचा आधार हरवला आहे. सुभाषच्या मृत्यूने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.