मांडवी गावात अंगणवाडी सेविकाच नाही

कुपोषित बालक व स्तनदा मातांचा प्रश्न ऐरणीवर

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मांडवी गावात दीड वर्षांपासून अंगणवाडी सेविकाच नाही. त्यातच 16 कुपोषीत बालकांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कुपोषित बालक व स्तनदा मातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निवड झालेल्या सेविकेला नियुक्तीपत्र देण्याची गावकऱ्यांची मागणी केली आहे.

झरी तालुका आदिवासीबहुल म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाकरिता मोठ्या प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. तालुक्यात कुपोषित बालकाच्या संख्याचा आकडा शासनाच्या सर्वेक्षणातून समोर आला असून तालुक्यात १६ कुपोषित बालकांची नोंद झाली असल्याची माहिती आहे. अंगणवाडी मार्फत गरोदर मातांना पोषक आहार पुरविला जातो. त्यात्र अंगणवाडी सेविका नसल्याने परिसरातील कुपोषित बालक व स्तनदा मातांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.

३ ते ६ वयोगटातील बालकांना अमृत आहार व अब्दुल कलाम योजना दरम्यान बालकांना वयानुसार आणि उंचीनुसार घरपोच आहार देण्यात येते. अशा विविध योजना दरम्यान कुपोषित बालकांवर देखरेख ठेवली जाते. तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्याचा आकडा वाढत चालला असल्याचे शासनाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर येत आहेत. तर या कुपोषित बालकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरावरून तर गावपातळीवर कर्मच्याऱ्यांची मोठी फौज काम करीत आहे.

कुपोषित बालकाच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात १०६ अंगणवाड्या तर मिनिअंगणवाडीची संख्या 30 आहेत. या अंगणवाड्या दरम्यान कुपोषित बालकाची संख्या १६ आहेत. यासह बालकांचा सर्वांगीण, शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने अंगणवड्याना खेळण्याचे साहित्य पुरविले जाते. तर अंगणवाडीतील बालकांसह स्तनदा माता आहार पुरवठा, जन्मलेल्या बालकांचे वजन, लसीकरण आणि कुपोषित बालके शोधून त्यांना सर्वच समावेश आरोग्य सेवा पुरविणे, 3 ते ६ वयोगटातील बालकांना घरपोच आहार पोहचविणे याची जबाबदारी अंगणवाडी सोबत पर्यवेक्षिका यांची आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पासून मांडवी गावात अंगणवाडी सेविका नसल्याने लहान मुलांचे मानसिक विकास झाले नाही, शाळेपूर्व शालेय शिक्षण मिळाले नाही, तसेच स्तनदा माता व लहान मुलांना अमृत योजनेचे आहार मिळाले नाही. ज्यामुळे कुपोषित बालक व स्तनदा मातांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी गावातील स्तनदा माता व लहान मुलांचा विचार करून नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविकेला नियुक्तीपत्र देण्याची मागणी गावकर्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन करून मागणी केली आहे.

ग्रामपंचायत अंगणवाडी सेविकेकरिता ग्रामसभा घेऊन सर्वानुमते मागणी केली आहे. त्यावेळी विशाल सुरावार, भीमरावं नगराळे, पंकज अडपावार, विनोद इपावार, लक्ष्मी लाडे, आनंदराव करपते, सुनील नेलावार, राजू यामटपेल्लीवार, अशोक अडपावार, मनोज गेडाम, विलास शिरगुरवार, गंगाधर सुरपाम, गजानन गोंद्रावर, प्रियंका भोयर, प्रगती गोंद्रावार,फुला पेंदोर, रेणुका आकुलवार, गजानन सुरवार, शंकर धुर्वे, सह समस्त गावकर्यांनी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.