मंगलम पार्क मटका अड्डा धाडीत 10 जणांंना अटक

4 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपींवर विविध गुन्हे दाखल

0

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील मंगलम पार्क 1 मधील आर.के. अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या मटका अड्डयावर बुधवारी वणी पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी मटका पट्टीवर उतारा घेताना दहा जणांना अटक केली. मंगल विठ्ठल खाडे, रा. आर.के. अपार्टमेंट, मंगलम पार्क वणी, महेश रमेश मोहबिया (31) शास्त्रीनगर वणी, सुमित चतुरदास झाडे (24) शास्त्रीनगर वणी, कार्तिक विठ्ठल मच्चेवार (25) शास्त्रीनगर वणी, कुणाल विठ्ठल बुर्रेवार (26) रामपूर वार्ड वणी, सचिन विनोद घनकसार (20) रंगारीपुरा वणी, अमीर अशफाक पठाण (23) रंगारीपुरा वणी, आकाश रामदास चौधरी (26) शास्त्रीनगर वणी, राहुल उल्हासराव वऱ्हाडे (35) मच्छी मार्केट वणी, नीलेश दिलीप झाडे (25) तैलीफेल वणी असे अटक करण्यात आलेले आरोपींचे नाव आहे.

      

पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट 20, कलर प्रिंटर 2, लेझर प्रिंटर 1, मोटरसायकल 3, कॅल्क्युलॅटर 8, सिलिंग फॅन 1 व इतर साहित्य असे एकूण 403440 रुपयांचे मुद्देमाल जप्त केले. जमादार सुदर्शन वानोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्द कलम 420, 465, 468, 471, 269, 188 भा.द.वि. सह कलम 4, 5 महाराष्ट्र जुगार कायदा अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपीला आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.

ठाणेदार वैभव जाधव यांना मंगलम पार्क येथील सदर ठिकाणी मटका अड्डा सुरू असल्याची खबरीकडून गुप्त माहिती मिळाली होती. उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात व ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मंगलम पार्क 1 मधील आर.के. अपार्टमेंटच्या 201 न. फ्लॅटवर काल दुपारी 3 वाजताच्या दरम्यान धाड टाकली होती.

     

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैभव जाधव, सपोनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोले, पंकज उंबरकर, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसवार, रवी इसनकर, इकबाल शेख यांनी केली. पुढील तपास पीएसआय गोपाल जाधव करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...