पार्टी करणे बेतले जिवावर, ट्रक व दुचाकीचा अपघात

एकाचाा मृत्यू, पार्टी करून परतताना घडली दुर्दैवी घटना

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी-घुग्गुस-चंद्रपूर राज्य महामार्गावर चारगाव चौकी परिसरात सोमवारी 11 जाने. रोजी रात्री 8 वाजता सुमारास ट्रक व दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मागे बसलेले दोन व्यक्ती जखमी झाले. घटनेची माहिती शिरपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. विकास सुभाष गानफाडे (22 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे.

       

प्राप्त माहितीनुसार पिंपरी (धानोरा) जि. चंद्रपूर येथील रहिवासी विकास गानफाडे हा आपल्या बुलेट मोटरसायकल (MH34 BP 9014) घेऊन दोन मित्रांसह सोमवारी ट्रिपल सिट वणी येथे आला होता. परत चंद्रपूरकडे जाताना रात्री 8 वाजता दरम्यान चारगाव परिसरात समोर जात असलेल्या एका अज्ञात वाहनावर त्याची मोटारसायकल मागून जोरदार आदळली. या अपघातात विकासच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघातात तो जागीच ठार झाला. तर बुलेटवर मागे बसलेले त्याचे दोन मित्र नागेश वऱ्हाटे (24) व नितेश वऱ्हाटे (27) हे किरकोळ जखमी झाले.

        

अपघातात ठार विकासचे भाऊ विशाल सुभाष गानफाडे, रा. पिंपरी (धानोरा) जि. चंद्रपूर यांनी घटनेबाबत शिरपूर पोलिसात तक्रार नोंदवली. प्रथमदर्शनी तपासात बुलेट चालक विशाल व त्याचे दोन्ही मित्र मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून मृतक विशाल गानफाडे विरुद्द कलम 279, 304 (अ) अनव्ये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

मंगलम पार्क मटका अड्डा धाडीत 10 जणांंना अटक

‘रिअलमी’च्या टिव्हीवर वाचवा तब्बल 27 हजार रूपये

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...