महावितरण विभागाचा भोगळ कारभारामुळे मांगली गावठाणातील जनता त्रस्त
डीपीमधील ग्रिप्स तुटल्याने लाईनचा खेळखंडोबा
सुशील ओझा,झरी: तालुक्यातील मांगली गावठाण येथील वीज पुरवठा डीपीची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे वेळोवेळी लाईन जात असल्याने ग्रामवासी त्रस्त झाले आहे. याकडे महावितरण विभागाच्या कर्मचारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. मांगली गावठाण ठिकाणची डीपी अतिशय खराब परिस्थितीत आहे.
दिपीमधील संपूर्ण ग्रीपा फुटून व जळून आहे. नेहमी स्पार्किंग होत असल्याने लाईट अनेकदा जाणे,लाईट लपलप करणे, ज्यामुळे विजेवर चालणारे उपकरणाला धोका निर्माण झाला आहे. या सर्व बाबीकडे लाईनमन ढुंकुनही पाहत नसल्याची ओरड गावकरी करीत आहे.
अखेर गावातीलच काही लोक ज्यांना थोडफार समजते ते फ्यूज टाकतात किंवा तार जोडतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. डीपीवरील सर्वच ग्रिप फुटून असल्यामुळे फ्यूज टाकताना कोणताही अपघात घडल्यास याला जवाबदार कोण असाही प्रश्न ग्रामवासी करीत आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी व आधीकारी यांना सांगूनही झोपेचे सोंग घेऊन असल्याने संताप व्यक्त होत आहे. वीज बिल वसुली करिता गावात येऊन सक्तीने वसुली करतात बिल भरण्याकरिता ग्राहकाकडे पैसे नसल्यास त्याची लाईन कापतात.
मग गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकरिता का येत नाही असा संतप्त प्रश्न मांगली गावठाणवासी करीत आहे. तरी गावठाण वरील खराब झालेली डीपी व्यवस्थित करून जळलेल्या ग्रिप बदलून लाईन सुरळीत करून द्यावी अशी मागणी केली जात आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा