कोरोनाचा वणी तालुक्यात कहर सुरूच

ग्रामीण झपाट्याने वाढत आहेत रुग्ण

0

जब्बार चीनी, वणी: सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 44 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 22, ग्रामीण 26, झरी तालुका २, नागपूर १ रुग्ण आहेत.

सोमवारी आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 324 झाली आहे. मृतकांची संख्या आता 28 झाली आहे. दरम्यान आज विकेंड लॉकडाऊन शहरात शंभर टक्के पाळण्यात आला.

शहरामध्ये महिंद्रा फायनान्स 1,रंगारीपुरा 2, प्रगतीनगर 1, गुरूनगर 1,जैन ले आऊट1, आंबेडकर चौक 1, एस.टी. डेपो 4, सेवानगर 1, जिजाऊनगर 2,तेली फैल 2, एकतानगर 1, नगर परिषद 2, बालाजी जिनिंग 1,चिखलगाव 2, नांदेपेरा 10, मोहदा 7, वागधरा 4, पळसोनी 1, ढुणकी 1, पिलकी वाढोना 1, झरी तालुका 3 आणि नागपूर 1 असे रुग्ण आढळलेत.

सोमवारी यवतमाळ येथून 279 अहवाल प्राप्त झाले. यात 32 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 166 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 20 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. अद्याप यवतमाळहून 753 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 23 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली

सध्या तालुक्यात 324 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 64 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 214 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 46 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे.

तालुक्यात कोरोनाचे एकूण 1886 रुग्ण आढळून आलेत. यातील 1534 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आजपर्यंत 28 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

हेदेखील वाचा

कोरोनाचा वणी तालुक्यात महाविस्फोट

हेदेखील वाचा

ग्रामवासीयांच्या मूलभूत गरजांच्या विरुद्ध काम करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करा- मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!