मांगली (हिरापूर) शेतशिवारात पट्टेदार वाघाचा मुक्त संचार?

0

सुशील ओझा, झरी:  मुकुटबन वनपरिक्षेत्र अंर्तगत मांगली (हिरापूर) जंगलालगत असलेल्या शेतशिवारात शेतकरीवर्गांना पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे  ते वाघाच्या दहशतीत वावरत आपल्या शेतातील शेती कामे करीत आहेत.

 

मांगली , हिरापुर , गाडेघाट आणि येदलापूर  गाव परिसरात मागील अनेक महिन्यापासून  पट्टेदार वाघाचे वास्तव्य असल्याची ओरड असताना, ७ एप्रिल रोज सायंकाळी मांगली गावाच्या लगत असलेल्या पैनगंगा नदी परिसरा लगत  शेतात शेत काम करणाऱ्याना पट्टेदार वाघाचे दर्शन घडले. वाघाला पाहून भयभीत होऊन शेतकरी दहशतीत वावरत शेती काम करीत   आहेत. परिसरात रोजच पट्टेदार वाघाचे शेतकरी व शेतशिवारात वावरणाऱ्यांना दर्शन होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी गावकरी सांगत आहेत. या संदर्भात काही शेतकऱ्यांनी व प्रत्यक्षदर्शींनी वनविभागास माहिती दिली. मात्र सदर परिसरात पट्टेदार वाघाचे वास्तव्य नसल्याचे  वनविभागाकडून सांगण्यात येत आहेत.

 

पट्टेदार वाघाच्या दहशतीने शेतशिवारातील शेतकरी लवकरच घरी परत जात आहेत. पैनगंगा नदी परिसरात जनावराची शिकार पट्टेदार वाघ  करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर मागील वर्षी याच हंगामात मांगली येथील दोन शेतमजुरांवर तर हिरापूर येथील माजी ग्रामपंचायत सरपंच आपल्या शेतात शेती काम करीत असताना  दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केले होते.

 

यावर्षी मांगली (हिरापूर) परीसरात पुन्हा पट्टेदार वाघाने एन्ट्री मारल्याने परिसर वाघाच्या दहशतीत सापडला आहे. पट्टेदार वाघाचे दर्शन रोजच होत असल्याने शेतशिवारात काम करणारे शेतकरी, शेत मजूर चांगलेच भयभीत वातावरणात वावरत आहेत. रात्री दरम्यान शेत शिवारात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरीवर्ग वाघाच्या दहशतीने घरा बाहेत पडणे टाळत आहेत. परिसरात नदी, नाले तर हिरवेगार झाड झुडपे असल्याने पट्टेदार वाघ दबा धरून राहत असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.