जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी उद्या सोमवार 11 सप्टेंबर रोजी वणीला येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ती उपस्थित राहणार आहेत. वणीमध्ये पहिल्यांदा आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोबतच प्राजक्ता माळी हिला जवळून पाहण्याची हजारो तरुण तरुणींची उत्सुकता वाढली आहे.
प्राजक्ता माळी हीने जुळून येती रेशीमगाठी, बंध रेशमाचे, सुवासिनी, सुगरण, गाणे तुमचे आमचे, बागडधाडची राणी, शिवपुत्र शंभूराजे, राणी यशुबाई ह्या मराठी मालिकासोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्यालम भाषेतील सिनेमामध्ये अभिनय केले आहे. मात्र महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून वणी येथे पहिल्यांदा भव्य दहीहंडी उत्सवचे आयोजन करण्यात आले आहे. येथील पाण्याची टाकी जवळ शासकीय मैदानावर उद्या सोमवार 11 सप्टेंबर रोजी 41 फुटावरील दहीहंडी फोडण्याचा थरार बघण्यासाठी हजारो नागरिक आतुरतेने वाट बघत आहे. मनसे दहीहंडी उत्सवात राज्यातील काना कोपऱ्यातून गोविंदा पथक सहभागी होणार आहे.
विजयी गोविंदा पथकाना भरघोस बक्षीस देण्यात येणार आहे. त्यात पहिला बक्षीस 2 लाख 51 हजार, दुसरा बक्षीस 1 लाख 1 हजार आणि तिसरा बक्षीस म्हणून 51 हजार रुपये गोविंदा पथकांना मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मान्यवर, अतिथी आणि महिलांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मनसेच्या या दहीहंडी उत्सवाला वणी उप विभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उघड्या डोळ्यांनी थरार अनुभवा. असे आव्हान मनसे नेता राजू उंबरकर यांनी केला आहे.
Comments are closed.