चिंचाळा-पाथरी रस्त्याची दुरवस्था

चार किमीचं अंतर कापायला पंधरा किमीचा फेरा, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष

0
ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पासून चार किमीअंतरावर असलेला चिंचाळा-पाथरी रोडची गेल्या वीस वर्षांपासून दुरस्ती न झाल्यानं या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे कायम पाठ फिरवल्यानं लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. जर हा रस्ताची दुरुस्ती केली नाही तर मोठं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा या मार्गावरील गावक-यांनी दिला आहे.
चिंचाळा-पाथरी रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दागडुजी झालेली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखल साचलं आहे. मारेगावला जाण्यासाठी अवघे चार किमीचं अंतर आहे. मात्र हे अंतर कापण्यासाठी ग्रामस्थांना 15 किमीचा फेरा पडत आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीनं दुर्लक्ष केल्यानं आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

(हे पण वाचा: शेतकरी पुत्राची विष पिऊन आत्महत्या) 

या रस्त्यासंबंधी या पुर्वी अनेकदा निवेदनं देण्यात आले आहेत. मात्र संबंधीत विभागानं आणि लोकप्रतिनिधींनी याकडे कायम दुर्लक्ष केलं. त्यामुळे या मार्गावरील तीन गावातील नागरिकांनी आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.