मारेगाव तालुक्यातील अनेक गावातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत

शेतकऱ्यांची वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात अनेक शेतक-याच्या कृषी पंपाचा होणारा वीज पुरवठा खंडीत केला आहे.  वीज वितरण कंपनीने तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.  कृषीपंपाचा तांत्रिक बिघाड तातडीने दुरूस्ती करावा व शासनाच्या आदेशाचे पालन करुन १५ नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांचे कृषी कनेक्शन कट करु नये या मागणीसाठी काँग्रेस कमिटी मारेगावच्या वतीने वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मेश्राम यांना निवेदन देण्यात आले आहे.

शासनाच्या वतीने कृषि संजिवणी योजना मुख्यमंत्र्यानी चालु केली असुन, १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्या कडे थकित असलेल्या बिलाच्या वसुलीसाठी तगादा लाऊ नये असे आदेश दिले आहे. ऊर्जा मंत्र्यांनी तसा आदेशही दिला आहे. मात्र आदेशाला केराची टोपली दाखवून वीज वितरण कंपनीने कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. पहिलेच अत्यल्प पावसाने पिकाची अवस्था बिकट आहे. पिकाला वाचविण्यासाठी सिंचनाची गरज आहे. पन वीज वितरण कंपनीकडून तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली शेतकऱ्याना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकर-यांची वीज बंद ठेवून थकबाकी वसूल करन्याचा फंडा असत्याचं मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.

उर्जा मंत्र्याचा आताचा जो आदेश धडकला त्यात आदेश दिल्याची तारीख व जावक क्र. नसल्याने हा आदेश खरा की खोटा असा संभ्रम शेतकर-यांमध्ये निर्माण झाला आहे, परंतु इकडे शासनाने आदेश काढायचा अन् तिकडे वीज पुरविणा-या कंपनीने वीजेचे कनेक्शन कापायचे. हा प्रकार म्हणजे शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणे होय. आधीच आर्थिक दृष्ट्या खचलेल्या शेतक-यांविषयी काढलेला आदेश जर वीज वितरण कंपनी मानत नसेल तर तालुक्यातील शेतकरी तीव्र आंदोलन करेल असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

निवेदन देते वेळी मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे, जि.प.महिला व बाल कल्याण सभापती अरूणा खंडाळकर, जि.प. सदस्य अनिल देरकर, नगरसेवक नंदेश्वर आसुटकर, रवि पोटे, रवि धानोरकर व अनेक शेतकरी उपस्थित होते.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

Leave A Reply

Your email address will not be published.