भाजपा प्रदेश प्रवक्त्यांची वणीला भेट

सरकारच्या विकासकामांचा मांडला लेखाजोखा, आमदारांच्या निवासस्थानी घेतली पत्रकार परिषद

0

विवेक तोटेवार, वणी: भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी गुरुवारी वणीला भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. राज्यातील 20 लाख हेक्टर जमीन जलशिवार योजनेअंतर्गत ओलिताखाली आणली. 34 हजार कोटींची शेतक-यांची कर्जमाफी देण्यात आली. त्याचा राज्यातील 70 लाख शेतक-यांना फायदा झाला, सरकार हे शेतक-यांच्या हितासाठी कायम तत्पर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवराय कुळकर्णी म्हणाले की, या अगोदरच्या सरकारने 2009 मध्ये दिलेल्या कर्जमाफीमध्ये फक्त बॅका समृद्ध झाल्या होत्या. त्यामुळे कर्जमाफीचा फायदा फक्त लोकप्रतिनिधींना झाला होता. या सरकारने कर्जमाफी करताना 70 लाख शेतक-यांचा सातबारा तीन महिन्यांच्या आत कोरा करण्याचा संकल्प केला आहे. तीन महिन्यांमध्ये कोणत्याही दलालाशिवाय किंवा मध्यस्थीशिवाय सर्व पैसा आम्ही शेतक-यांच्या खात्यात जमा करणार आहे.

यावेळी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं. आघाडीच्या सरकारने संपूर्ण राज्याची वाट लावली होती व जागोजागी खड्डे करून ठेवले होते. ते खड्डे भरुण काढण्याचे कार्य हे फडणवीस सरकार करीत असून राज्याच्या विकासाठी गाडी पूर्णवत आणत आहे. असेही ते म्हणाले.

यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार म्हणाले की फडणवीस सरकार हे योग्य पद्धतीने कार्य करत असून गेल्या तीन वर्षांत सरकारने जनतेच्या हिताचेच कार्य केले आहे. याबाबत जनतेच्या मनात कोणताही संभ्रम असून नये याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, जिल्हा महामंत्री अमर दिनकर, वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार, तालुका अध्यक्ष संजय पिंपळशेंडे, शहर अध्यक्ष रवि बेलुरकर, जिल्हा परिषद सदस्य बंडु चांदेकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील सूर यांच्यासह वणीतील पत्रकार उपस्थित होते.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

जाणून घ्या काय म्हणतात संजीवरेड्डी बोतकुरवार…

Leave A Reply

Your email address will not be published.