जनावर तस्करांवर मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

8.14 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात जनावरांची तस्करी करणा-यांवर कारवाई केली. आज शनिवारी पहाटे 4 वाजता घोगुलदरा-कुंभा मार्गावर ही कारवाई करण्यात आली. मात्र आरोपी घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी 10 गायी व कालवडांची सुटका करण्यात आली आहे. सध्या आरोपींचा शोध सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की मारेगाव तालुक्यातील घोगुलदरा-कुंभा मार्गावरील बाभळी पोड गावाजवळ जनावरे तस्करी करणारे वाहन जात असल्याची गोपनीय पण खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे मध्यरात्री पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान पहाटे 4 वाजताच्या सुमारास घोगुलदरा-कुंभा मार्गावर एक बलोरो (MH37 B2375) व एक दुचाकी (MH29 X8607) हे दोन वाहने येताना आढळून आले. मात्र पोलिसांची नाकेबंदी पाहून बोलेरो चालक व दुचाकीचालकांनी गाडी रस्त्यातच ठेवून जंगलात पळ काढला.

पोलिसांनी बोलेरोची तपासणी केली असता तिथे त्यांना जनावरे कोंबून असलेले आढळले. पोलिसांनी बोलेरो 7 लाख रुपये दुचाकी 20 हजार रुपये व जनावरे 93 हजार रुपये व एक सॅमसंगचा मोबाईल ज्याची किंमत 1 हजार रुपये असा एकूण 8 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी 10 गाय व कालवडाची सुटका केली.

अज्ञात आरोपींवर गोवंश बंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, या कारवाईचा तपास मारेगावचे पोलीस निरिक्षक जगदिश मंडलवार यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद अलचेवार, श्रीराम हिवरकर, नितीन खांदवे, अजय वाभिटकर, अतुल सरोदे करित आहे.

हे देखील वाचा:

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

कत्तली करिता तेलंगणात जाणाऱ्या 16 जनावरांची सुटका

Leave A Reply

Your email address will not be published.