मारेगाव तालुका भाजपतर्फे राज्यसरकारचा निषेध

12 आमदारांच्या निलंबनाविरोधात तहसिलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन

0

भास्कर राऊत, मारेगाव: राज्यसरकारने विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात भाजपच्या 12 सभासदांचे एक वर्षासाठी निलंबन केले. याचा मारेगाव तालुका भाजपतर्फे निषेध करण्यात आला. हा प्रकार लोकशाहीची गळचेपी असून तहसीलदार मारेगाव यांच्यामार्फेत राज्यपाल यांना निवेदन पाठवून याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यातील सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर तालिका अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांनी सभागृगात गैरसंसदीय वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना एक वर्षासाठी निलंबित केलं आहे.

हे निलंबन घटनाबाह्य असून हा लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. सरकारच्या ओ.बी.सी. धोरणाचा निषेध करीत हा सरकारतर्फे चालवलेला तमाशा आहे असा आरोप करत मारेगाव भाजपने याबाबत राज्यपालांना तहसीलदारांमार्फत निवेदन दिले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस शंकर लालसरे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, पवन ढवस, आनंद पचारे, महिला तालुका अध्यक्षा सुनीता पांढरे, शोभा नक्षणे, मारोती राजुरकर, मारोती तुरणकर, विठ्ठल दानव, संदीप उमरे, राजेश पांडे, रवींद्र टोंगे, शालिनी दारुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

काय म्हणाले या वेळी शंकर लालसरे?

हे देखील वाचा…

सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाचे उर्वरित काम सुरू

मानकी रोडवर आढळला इसमाचा मृतदेह

 

Leave A Reply

Your email address will not be published.