मारेगाव तालुक्यात निशांत चव्हाण, झरी तालुक्यात एंजल पुनवटकर अव्वल

यंदा दहावीचा निकाल घसरला

0
ज्योतिबा पोटे, सुशील ओझा: यंदा मारेगाव आणि झरी या दोन्ही तालुक्याचा निकाल घसरला आहे. दहावीच्या परीक्षेत मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल ५३.७०% लागला आहे. मारेगाव तालुक्यात विद्यानिकेत इंग्लिश मिडयम स्कुलच्या निशांत चव्हाणने ८८.४०% गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला, तर याच शाळेचा यश मोघे ८६% घेऊन तालुक्यातुन द्वितीय आला तर आदर्श हायस्कुलची सेमी इंग्लिशची विद्यार्थिनी श्वेतांबर बाबाराव झाडे ८५. ८१% गुण घेउन तालुक्यातुन तिसरी आली.

झरी तालुक्यात गुरुकुल कॉन्व्हेंट मुकुटबन या शाळेचा सर्वाधिक ९५.४५ % निकाल लागला आहेत. याच शाळेतील एंजल पुनवटकर हिने ८५.०० % गुण प्राप्त करून फक्त शाळेतूनच नाही तर झरी तालुक्यातुन पहिला क्रमांक प्राप्त केला. यासोबतच ओमकार जंभे ८४.२०%, वसुधा वरहाटे ८३%, संयम तातेड ८२.६०%, अनिकेत व्हराटे ८२.४०, तर युवराज निखाडे ८१.२० % गुण प्राप्त करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. झरी तालुक्यातील पहिले ३ क्रमांक गुरुकुलच्याच विद्यार्थ्यांनी पटकाविले आहे.
मारेगावमध्ये विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कुलची १००% निकालाची परंपरा खंडित झाली,विद्यानिकेतन स्कुलचा ९२.४०%, शासकिय आश्रम शाळा बोटोणी ७५.५१%, हटवांजरी ७०%,आदर्श हायस्कूल मारेगाव. ६७.९६%, नरसाळा ५०%,पंचशील नवरगाव ४१.०२%,आदर्श मार्डी ४४.८२%, चोपने बोटोणी ३४.४८%, कन्या मारेगाव ६२.९६%, भारत कुंभा ४७.७२%, जगन्नाथ वेगाव ४७.७२%, राष्ट्रीय भोवरा मजरा ४१.८६%, दर्शन भारती गोंडबुरांडा ३१.८१%, लक्ष्मीबाई जळका ६३.३३%, राष्ट्रीय मारेगाव ४८.९०%, ज्योतिबा फुले मारेगाव. २१.४२%, चिंचमंडळ ५१.६१%, युगांतर कान्हाळगाव ४८.३८%, गिरजाबाई पिसगाव ३३.३३%,संकेत सराटी ५६.४१%, संकेत गौराळा ५५.५५%, पुरले आश्रम मारेगाव ५७.१४% म्हैसदोडका ५.२६% निकाल लागला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.