10 वीचा निकाल जाहीर, ‘हा’ विद्यार्थी तालुक्यातून प्रथम

यंदाही मुलींची बाजी, पहिल्या 5 मध्ये 4 मुली टॉपर

0 3,349
निकेश जिलठे, वणी: मार्च 2019 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल आज शनिवारी 8 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. परिसरात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या 5 टॉपरमध्ये 4  मुली आहे. जनता शाळेने यावर्षीही टॉपरची परंपरा कायम ठेवली आहे. जनता विद्यालय वणीचा ऋत्विक राजेश्वर चौधरी हा विद्यार्थी 96.20 % गुण मिळवून तालुक्यातून प्रथम आला आहे.  एसपीएम शाळेतील कु. मानसी विलास डहाळकर ही 95.40 % गुण घेऊन शाळेतून प्रथम व वणीतून द्वितीय क्रमांकावर टॉपर राहिली आहे. तर याच शाळेतील कु. गार्गी शाम देशपांडे ही 94.00 % गुण घेऊन वणीतून तृतिय व एसपीएम विद्यालयातून द्वितीय क्रमांकावर राहिली आहे. तर लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलची कु. शर्वरी प्रदीप मून ही 92.40 % गुण घेऊन शाळेतून प्रथम व वणीतून चौथ्या क्रमांकावर आहे.  जनता हायस्कूलची कु. अर्पिता अरविंद पिंपळकर 92.20 % घेऊन पाचव्या क्रमांकावर राहिली आहे.
जनता विद्यालयाची कु. कल्याणी संजय घुगुल 91.40 %, लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलचा अतिक भारत धानोरकर 91.00 %, वणी पब्लिक स्कूलमधून संकेत गजानन गहुकर 89.80 % (शाळेतून प्रथम) एसपीएम विद्यालयाची कु. तनवी दिलिप पेंदोर 88.06 %, एसपीएम विद्यालयाची कु. श्वेता पांडे 88 %, विवेकानंद विद्यालयाची कु. जयश्री सूर्यभान बुरडकर 87.20 % (शाळेतून प्रथम), विवेकानंद विद्यालयाचीच कु. ऋषाली वामन बोर्डे व संबोध जीवन भगत 85 %, नुसाबाई चोपणे कन्या विद्यालयाची कु. सुबोधी गावंडे 84.00 % (शाळेतून प्रथम), राजश्री शाहु महाराज हिंदी विद्यालय वणीचा आनम युनुस खान 81.40 % (शाळेतून प्रथम), आदर्श विद्यालय वणीची कु. तबस्सूम अब्दुल रब 72 % (शाळेतून प्रथम) हे विद्यार्थी अव्वल ठरले आहेत.

यावर्षी वणी तालुक्यात एकूण 2634 विद्यार्थी दहावीला होते. त्यातील 2602 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 1665 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. हा निकाल 63.98 % इतका आहे. मारेगाव तालुक्याचा 53.70 टक्के निकाल लागला आहे. यात 1012 विद्यार्थी दहावीला होते. 985 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 529 विद्यार्थी पास झाले आहेत. तर झरी तालुक्याचा निकाल 54.69 % इतका लागला आहेत. झरी तालुक्यात 922 विद्यार्थी दहावीला होते. 894 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील 489 विद्यार्थी पास झाले आहेत.
वणीतील लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कुलचा सर्वाधिक निकाल लागला असून या शाळेतील 94.02 % विद्यार्थी पास झाले. झरी तालुक्यातून मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंटचा सर्वाधिक निकाल लागला असून याशाळेचे 95.45 % विद्यार्थी पास झाले आहेत. तर मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम हायस्कूलचा निकाल 92.45 % लागला आहे. जगन्नाथ महाराज विद्यालय वणी व ब्राह्मणी येथील बहुउद्देशीय ग्रामीण विकास विद्यालयाचा निकाल सर्वात कमी म्हणजे शुन्य टक्के लागला आहे.

Comments
Loading...