यशोगाथा: मारेगाव तालुक्यातील तरुण शेतक-यांनी फुलवली झेंडुची शेती

15 दिवसातच घेतले 50 हजारांचे उत्पन्न

0

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील बोधाड, मार्डी, बांबर्डा, चनोळा येथील तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फुलझाडांची लागवड केली. झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच त्यांना 50 हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत यांना खर्च वजा करता सुमारे 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे. या तरुणांनी मारेगाव येथील कृषी विभागाच्या मार्गदर्शनात ही शेती केली आहे.

मारेगाव तालुक्यातील तरुण शेतकरी असलेले गजानन चौधरी, दिवाकर पंडिले, गोपाल ढोले, मेघराज बेलेकर, सुभाष लांबट यांच्यासारख्या जवळपास 14 शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील एका एकरात झेंडूच्या फुलांची लागवड केली. त्यांनी 3 रुपये प्रमाणे रोपे विकत घेतली होती. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात यांनी एका एकरात जवळपास 7 हजार झेंडूच्या रोपांची मल्चिंग व पेप्सी ठिबक पद्धतीने लागवड केली.

या पद्धतीमध्ये त्यांना 70 हजार रुपये खर्च आला. सध्या झाडांची पूर्ण वाढ झाली असून 3 महिन्याच्या या उत्पन्नात त्यांना पहिल्याच पंधरा दिवसातच 50 हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. सध्या हे शेतकरी प्रत्येकी 4000 रुपये रोज प्रमाणे उत्त्पन्न घेत आहे. तीन महिन्यात खर्च वजा जाता त्यांना 3 लाख रुपये निव्वळ नफा मिळणार असल्याची खात्री त्यांना आहे.

आज 40 ते 50 रुपये किलो झेंडूच्या फुले आहेत. परंतु लग्न सिजनमध्ये हे भाव दुप्पट ते तिप्पट होते. त्यामुळे नफा देखील वाढण्याची शक्यता आहे. या तरुण शेतक-यांना मारेगाव तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी एन जे निकाळजे व कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर गाडगे यांनी मार्गदर्शन केले होते. इतर शेतक-यांनीही पारंपरिक शेतीसह इतर पिकांचीही लागवड करावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे. याबाबत जे काही मार्गदर्शन लागणार ते कृषी विभाग करणार आहे.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेट व्यवसायाला ‘ब्लॅकमेलिंग”चा जोडधंदा (भाग 4)

आंघोळ करीत असताना महिलेचे मोबाईलवर फोटो काढून विनयभंग

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.