विवाहितेला फेसबुकवर झाला प्यार… मुलगीही झाली, मात्र प्रियकराचा इन्कार

प्रियकराचा ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न... आरोपीविरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: पीडिता ही विवाहित होती. अचानक एक दिवस तिची एका तरुणाशी फेसबुकवरून मैत्री झाली. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यातून तिला एक मुलगीही झाली. मात्र एक दिवस ही बाब तिच्या पतीला माहिती झाली. पतीने पीडितेला घराबाहेर काढले. पीडिता प्रियकराकडे गेली. मात्र प्रियकराने हात वर केले. एकीकडे पतीसोबत भांडण तर दुसरीकडे प्रियकराने हात वर केले. त्यामुळे द्विधा मनस्थितीत असलेल्या पीडितेने अखेर वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. 

सविस्तर वृत्त असे की, पीडिता ही विवाहित असून ती 38 वर्षांची आहे. ती वणी येथील रहिवाशी आहे. शहरातील मनिष नगर येथे आरोपी स्मित गोवर्धन तेलतुंबडे (28) राहतो. दोन ते अडीज वर्षांआधी फेसबुकच्या माध्यमातून पीडितेची आरोपीशी ओळख झाली. त्यांची मोबाईलवर चाटींग सुरू झाली. काही दिवसांनी त्यांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले. त्यानंतर त्यांच्यात मोबाईलद्वारा बोलणे व्हायचे.

सेमीनारच्या माध्यमातून त्यांची अनेकदा भेटही झाली. 10 ऑगस्ट 2019 रोजी पीडिता ही घरी एकटी असताना आरोपी हा तिच्या घरी आला. त्याने बळजबरी करीत तिचा विश्वास संपादन केला व पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अनेकदा त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. दरम्यान पीडिता ही गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने आरोपीला सांगितली व गर्भपात करण्याचा विचार असल्याचेही सांगितले. मात्र आरोपीने गर्भपात न करता मुलीला जन्म देण्याचा सल्ला दिला. तसेच तिचे पालकत्व घेतो असेही सांगितले. अखेर दिड वर्षांआधी पीडितेने एका खासगी रुग्णालयात एक गोंडस मुलीला जन्म दिला.

आरोपीचा ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न
दरम्यान आरोपीने पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्याने पीडितेला धमकावून तिच्या एटीएम मधून वारंवार पैसे काढले. सुमारे 4 लाख रुपये त्याने एटीएममधून काढले. त्यानंतर आरोपी हा पीडितेला धमकावत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित करत होता. दरम्यान सातत्याच्या पैशाच्या मागणीला कंटाळली होती. दरम्यान एके दिवशी पतीला पीडितेच्या प्रकरणाबाबत माहिती झाले. तसेच दीड वर्षांची मुलगी देखील त्याची नसल्याचे कळले. त्यामुळे पती हादरून गेला. 

यावरून पीडितेमध्ये व पतीमध्ये भांडण झाले. पतीने पीडितेला घराबाहेर काढले. त्यामुळे पीडिता मुलीला घेऊन आरोपी स्मितच्या घरी गेली. मात्र त्याने ती मुलगी त्याची नसल्याचे सांगून पीडितेला घरून हाकलून दिले. एकीकडे प्रियकर जबाबदारी ढकलत होता तर दुसरीकडे पतीशी वाद सुरू होते. सततच्या वादाला कंटाळून पीडितेने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला.

अखेर दोन्ही कडून असहाय झालेल्या पीडितेने वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी स्मित गोवर्धन तेलतुंबडे (28) याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीवर भादंविच्या कलम 376, 417, 506 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा प्राथमिक तपास शिवाजी टिपूर्णे करीत आहे.

हे देखील वाचा:

जम्बो पक्ष प्रवेशाने काँग्रेसमधली मरगळ दूर होणार ?

मैत्रिणीनेच केला विश्वासघात, दुष्कर्मासाठी आरोपीला दिली साथ

लग्नाच्या आमिषाने आधी शरीरसंबंध, नंतर लग्न करण्यास टाळाटाळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.