वणीत मटकापट्टी जोमात… तिर्री, छगण, नागो, मेंढीची गुंज

पोलीस स्टेशनच्या समोर आणि बाजुलाच मटका सुरू

0

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यामध्ये अवैध व्यवसाय पुन्हा जोर पकडायला लागला आहे. ठाणेदार मुकुंद कुळकर्णी असेपर्यंत अवैध व्यावसायिकांवर वचक होता. पण त्यांची बदली होताच पुन्हा अवैध व्यावसायिकांनी आपले डोके वर काढावयास सुरवात केली आहे. इतकच काय तर चक्क पोलीस स्टेशन समोर असलेल्या गाळ्यामध्येच मटका चालतो. पोलीस स्टेशनच्या बाजुला असलेल्या सिंधी कॉलनी, सोबतच नगर पालिकेच्या मागेही मटका सुरू आहे. आतापर्यंत अवैध व्यावसायिकां विरुद्ध कार्यवाही करणारे डी. बी. पथकाचीही धार बोचट झाली आहे.

वणीमध्ये दीपक टॉकीज परिसरामध्ये पुन्हा अवैध धंदे फोफावयास सुरवात झाली आहे. त्याचप्रमाणे सिंधी कॉलोनी, इंदिरा चौक, बाकडे पेट्रोल पंप जवळ, नगर परिषदच्या बाजूला, शाम टाकीज या परिसरामध्ये खुलेआम मटका जुगार सुरू झाला आहे. वणीतील दीपक टाकीज परिसरात तर अवैध दारू विक्रेते सकाळीच खुलेआम दारू विक्री करताना दिसून येत आहे. सदर परिसरात रविवारी आठवडी बाजार असतो त्यामुळे महिलावर्गास  भाजी खरेदीसाठी यावेच लागते. त्यांना या परिसरातून जाताना तोंडावर रुमाल ठेऊनच जावे लागते. परंतु प्रशासन मात्र याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येते.

वणीमध्ये अगदी नगर परिषदेच्या बाजूला मटका व्यवसाय जोमाने सुरू दिसतो आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बाजार असतो आणि महीला वर्गाची या ठिकाणी रेलचेल नेहमीच असते. कधी भाजी घेण्यासाठी तर कधी कपडे खरेदीसाठी महिलावर्ग इथे येत असतो.

वणी परिसरात राजरोसपणे मटका पट्टी सुरू

(हे पण वाचा: परिसरात कोळसा तस्करीला उधाण, पोलीस, वेकोलीचे पाठबळ ?)

वणीकर जनता आता नव्याने आलेल्या ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्याकडून अवैध व्यवसाय बंद होईल या आशेवर आहेत. त्यांनी जनावरांची तस्करी करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कार्यवाही केल्याने आता वणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. आता ठाणेदार यअवैध व्यावसायिकांवर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसंच जर कार्यवाही करण्यात आली तर ती केवळ छोट्या माशांवर होणार की मोठ्या माशांवरही हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.