अन् मटकेवाल्यांनी दिली सारस्वतांना मानवंदना !
निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये शुक्रवारी अखिल भारतीय विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. शुक्रवारी वणी शहरात मुख्यमंत्री येणार म्हणून चोख बंदोबस्त होता. जिल्हातील गावागावातून पोलिसांचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोजफाटा वणीत आला होता. कधी नव्हे ते या निमित्ताने वणीतील रस्त्यांची दागडुजी करण्यात आली. रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटवण्यात आले. त्यामुळे वणीकरांचा थोडा का होईना दिलासा मिळाला.
मुख्यमंत्री येणार म्हणून वणीत फोफावलेल्या अवैध व्यावसायिकांनी त्याची चांगलीच धास्ती घेतली. वणीत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सारस्वतांचा मेळा भरणार मग अशा वेळी मटका व्यावसायिक त्यांचे व्यवसाय कसे बरे सुरू ठेवू शकतात. मटकेवाल्यांनी वणीतील त्यांचा व्यवसाय बंद ठेवून एक प्रकारे वणीत येणा-या सारस्वतांना मानवंदनाच दिली. अवैध मटका सुरू असलेल्या ठिकाणी शुक्रवारी सामसूम होते. इतकंच काय ते मटक्याच्या बाजुला असलेले कॅन्टिनही त्या निमित्ताने बंद ठेवण्यात आले होते. जर मटका पट्टी लावणारेच येणार नाही तर व्यवसाय कसा होणार यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असला. त्यामुळे हॉटेल चालकाला शुक्रवारी चांगलेच नुकसान सोसावे लागले.
मटका बंद असल्याने मटका लावणा-यांचे चांगलेच हाल झाले. दिवसभर कुठे मटका सुरू आहे का यासाठी फोनाफानी सुरू होती. मात्र मुख्यमंत्री हे स्वतः गृहमंत्री असल्याने अवैध व्यवसायिक कोणहीही रिस्क घेण्यास तयार नव्हते. अखेर दुपारी मुख्यमंत्री उद्घाटनानंतर परत गेले आणि मटकेवाल्यांनी मोकळा श्वास घेतला. त्यानंतर हळूहळू मटका व्यावसायिकांनी त्यांचे व्यवसाय सुरू करायला सुरूवात केली. दिवसभर पट्टी लावता न आल्याने आलेली लावणा-याला आलेली बेचैनी मटका सुरू होताच दुर झाली. पुन्हा त्यांचे लोंढे मटकापट्टीकडे वळू लागले. आणि त्यांच्या चेहरा एकदाचा फुलला.
वणीत साहित्य संमेलन आहे त्यामुळे किमान उद्घाटनाच्यावेळी तरी असे व्यवसाय नको की मुख्यमंत्री येणार त्यामुळे रिस्क नको की त्यांना वरूनच व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश आले होत हे अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याच निमित्ताने का होईना काही काळासाठी तरी वणीतील अवैध व्यवसाय बंद होते. आणि हीच ठरली वणीत जमलेल्या साहित्यिकांच्या मेळ्याला मानवंदना….!