नगर पालिकेच्या चाळीतच भरतोय मटक्याच्या बाजार

तहसिलदारांचे निवासस्थान आणि पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर

0

रवि ढुमणे, वणी: वणी शहरातील अगदी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तहसीलदार यांच्या बंगल्याच्या शेजारीच मटक्याच्या बाजार भरतोय. मात्र पोलीस ठाण्यापासून हा बाजार हाकेच्या अंतरावर असूनही या अवैध धंद्याबाबत पोलिसांनी जणू चुप्पीच साधल्याचे दिसत आहे. एकूणच एकता नगर समोर असलेल्या नगर पालिकेच्या चाळीत मटका लावणा-यांची चांगलीच झुंबड उडत असताना सर्वच गप्प आहेत. वणीत राजरोजपणे मटका सुरू असूनही याकडे पोलीस प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी देखील चुप्पी साधून आहे. त्यामुळे या मटक्या व्यवसायाला पोलीस प्रशासनाचं आणि राजकीय नेत्यांचं पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.या अवैध बाजाराबाबतचा व्हिडीओ वणी बहुगुणीच्या हाती आला आहे.

जिल्ह्यात वरकमाईचे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वणी परिसरात अवैध व्यवसायांना सध्या सुगीचे दिवस आले आहे. विद्यमान आमदार यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावरील नगर पालिकेच्या चाळीतच मटका व्यवसाय तेजीत सुरू आहे. लगतच भूमिअभिलेख कार्यालय, बाजूला तहसीलदार, न्यायाधीश,आणि वनविभागातील अधिकारी कर्मचारी यांची निवासस्थाने आहेत. इतकेच नव्हे तर पोलीस ठाणे,तहसील कार्यालय, न्यायालय आदी कार्यालये सुद्धा हाकेच्या अंतरावर आहे. उपविभागीय अधिकारी, विद्यमान आमदार यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावरील नगर पालिकेच्या चाळीतच मटका व्यवसाय जोरात सुरू आहे.

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ग्रामीण भागासह शहरातील लोकांची पैसे लावण्यासाठी एकच झुंबड उडते. जणू काही बाजाराचे स्वरूपच या पालिकेच्या चाळीला आले असल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी असलेल्या चहा कॅन्टीन, नाश्ता सेंटर आदी व्यवसायांना सुगीचे दिवस आले आहे. एकूणच पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगर पालिकेच्या चाळीत मटक्यासाठी लोकांची झुंबड उडायला लागली आहे.

पाहा याबाबत वणी बहुगुणीच्या हाती लागलेला हा व्हिडीओ.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.